रामदास आठवलेंनी सुचवला 2-3 चा ‘फॉर्म्युला’, शिवसेनेला भाजपसोबत येण्यासाठी घातली ‘साद’ !

पोलिसनामा ऑनलाइन – रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेक नाराजीनाट्य घडत आहेत. त्यामुळं उद्धव ठकारेंनी पुन्हा एकदा भाजपसोबत यावं अशी साद आठवलेंनी घातली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही एनडीएसोबत यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

‘शिवसेनेनं 50-50 फॉर्म्युल्यावर भाजपसोबत यावं’

रामदास आठवले म्हणाले, “शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार 5 वर्षे चालणार नाही. कामं होत नसल्यानं अनेक नेते नाराज आहेत. त्यामुळं बंडखोरीची शक्यता आहे. तसं झालं तर सरकार कोसळेल आणि राज्यात भाजपची सत्ता येईल. शिवसेनेनं चक्रव्युहात अडकू नये. त्यांनी 50-50 फॉर्म्युल्यावर भाजपसोबत यावं. रिपाइंला सोबत घ्यावं आणि राज्यात सरकार स्थापन करावं” अशी ऑफर आठवलेंनी दिली आहे.

‘नंतरची 3 वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील’

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावरही आठवलेंनी तोडगा सुचवला. आठवले म्हणाले, “उद्धव ठाकरे जवळपास एक वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखादं वर्ष मुख्यमंत्री रहावं. त्यानंतरची 3 वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील.” असा पर्याय त्यांनी सुचवला आहे.

पुढे बोलताना आठवले म्हणाले, “भाजपसोबत आल्यानंतर सर्वाधिक फायदा हा शिवसेनेलाच होणार आहे. त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदं मिळतील. शरद पवारांनी देखील शेतकऱ्यांच्या भल्यासाठी एनडीएसोबत यावं” अशी सादही त्यांनी घातली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like