व्हाट्सअॅपवरून अफवा नकोच आनंद पसरवा ; वर्तमानपत्रात जाहिरात 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील एकूण २० कोटी  व्हाट्सअॅप युजर्सना व्हाट्सअॅपकडून एक महत्वाचे आवाहन केले आहे. “व्हाट्सअॅपवरून  अफवा आणि खोट्या बातम्यांचा प्रसार थांबविन्यासाठी मदत करा” अशा प्रकारची जाहिरात देऊन जनजागृती करण्यात आली आहे. तसेच  पोस्ट फेक आहे, हे कसे ओळखायचे याची माहिती या जाहिरातीत देण्यात आली आहे. यासोबतच आनंद पसरवा, अफवा नाही, असा संदेशही या जहिरातीतून देण्यात आला आहे. व्हाट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवणाऱ्या पोस्ट ,फोटो ,व्हिडीओ व्हायरल करण्यात येतात. या अफवांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत . त्यामुळेच वर्तमानपत्रात ही जाहिरात देऊन जनजागृती करण्यात आली आहे.

 फेक पोस्ट –

याबरोबरच पोस्ट फेक आहे, हे कसे ओळखायचे याची माहिती या जाहिरातीत देण्यात आली आहे. यासोबतच आनंद पसरवा, अफवा नाही, असा संदेशही या जहिरातीतून देण्यात आला आहे.त्यासोबतच पोस्टची सत्यता न पडताळता पोस्ट वायरल करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. व्हाट्सअॅपच्या फेक पोस्टमुळे जातीय दंगली सारख्या घटना घडल्या आहेत. नुकतेच गोवर-रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याची अफवा पसरल्याने देखील खळबळ उडाली होती. म्हणून अशा फेक पोस्टवर आळा घालने गरजेचे असल्याने व्हाट्सअॅपने हे पाऊल उचलले आहे. काही दिवसापूर्वीच व्हाट्सअॅपने फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठीचा नवीन फीचर देखीन अपडेट केला आहे.

फेक बातम्या ओळखा

व्हाट्सअॅपवरील फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठी पोस्टवरील उजव्या बाजूला एक चिन्ह देण्यात आले आहे. ते चिन्ह जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे बातमी खरी आहे की खोटी, हे ओळखण्यास मदत होईल. उदाहरणार्थ, ज्या संदेशाचे मुळ स्त्रोत माहित नसते, ज्यांचा पुरावा नसतो, असे फॉरवर्डेड मेसेजेस ज्यामुळे तुम्हाला संताप येतो, असे फोटो, व्हिडीओ, एवढेच नाही तर व्हॉईस रेकॉर्डिंगसुद्धा एडिट करुन तुमची दिशाभूल केली जाऊ शकते, असे जाहिरातीत म्हटले आहे.

तपासून घ्या

सत्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्च करा आणि बातम्यांच्या विश्वसनीय साईट्सवरुन ही बातमी कुठून आली आहे, याचा शोध घ्या. तरी देखील शंका असेल तर सत्य शोधणाऱ्या वेबसाईट्स, विश्वासपात्र व्यक्ती किंवा लीडर्सकडून अधिक माहिती मिळवा, असे यात म्हटले आहे.

अफवांचा परासार थांबवण्यासाठी मदत करा

जर, तुम्हाला वाटत असेल की एखादी बातमी फेक आहे, तर लोकांना सांगा की शेअर करण्यापूर्वी ती तपासून पहा भले तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असली तरी त्यांनी शेअर करण्याची विनंती केली आहे म्हणून उगीचच शेअर करु नका, असेही जाहिरातीत सांगितले आहे.