फक्त १० रुपयांत तयार करा ५० रुपयांचा हँडवॉश ; अगदी ५ मिनिटात

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अंघोळीचा साबण सुगंधी आणि किटाणूंपासून रक्षण करणारा असतो. हा साबण वापरून छोटा होतो आण हातात सापडत नसल्याने आपण असे साबणाचे तुकडे टाकून देतो. परंतु, हे तुकडे टाकून न देता एका बरणीत साठवून ठेवा. या तुकड्यांपासूनच अगदी पाच मिनिटात ५० रूपयांचा हँडवॉश बनवता येतो.

साबणाच्या तुकड्यांसह मिक्सर, एक ग्लास गरम पाणी आणि १ टोपण डेटॉल हे हँडवॉश बनविण्यासाठी लागते. या सर्व गोष्टींपासून ५०० ग्रॅमपेक्षा जास्त उत्तम दर्जाचा हँडवॉश तयार करता येतो. घरामध्ये साबणाचे तुकडे नसल्यास तुम्ही फक्त १० रुपयांचा स्नानाचा साबण खरेदी करूनही हँडवॉश तयार करू शकता. चांगल्या क्वालिटीचे हँडवॉश तयार करायचे असल्यास महागड्या साबणाचा वापर करावा लागेल.

सर्वप्रथम सुरीने साबणाचे बारीक बारीक तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये टाका. हे तुकडे पाण्यात बुडतील ऐवढेच पाणी टाकून मिक्सरमध्ये पातळ पेस्ट बनवून घ्या. लक्षात असू द्या ही पेस्ट जास्त पातळ करू नका. तयार झालेल्या पेस्टमध्ये एक ग्लास गरम पाणी टाका तसेच एक चमचा डेटॉल टाकून मिश्रण चांगले ढवळून घ्या. आता तुमचे हँडवॉश तयार झाले असून ते एका जुन्या
हँडवॉशच्या बाटलीत भरून ठेवा.