‘नवं वर्षात पोलिसांना तणावमुक्त करून जगातील सर्वोत्कृष्ट गोष्टी उपलब्ध करून देऊ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन संचलन समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाशी संवाद साधला.

कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यावेळी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध करून देऊ, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

भूमिपूजन करण्यात आलेल्या प्रकल्पामध्ये प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुल आणि सर्व सुविधायुक्त 448 सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात तळमजल्यासह सात मजल्यांच्या 16 इमारतींचा समावेश असणार आहे.

पोलिसांचे संचलन आणि मानवंदना यांचा सन्मान स्वीकारण्याची संधी मिळाली हा आयुष्यातील अनमोल ठेवा आहे. पोलिसांचे प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा यासाठी जगातील सर्वोत्तम गोष्टी महाराष्ट्र पोलिसांना उपलब्ध करून देण्याची ग्वाही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.तसेच पोलीस नेहमीच तणावात असतात त्यामुळे नववर्षात त्यांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी प्रशासन घेईल असे म्हणत मुख्यमंत्र्यांची पोलिसांना नवं वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/