अरे देवा ! मला आमदार बनवा अन् ‘नशापाणी’, दंडाच्या चिंतेपासून मुक्त व्हा, भाजप आमदाराकडून प्रचाराचा ‘फंडा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु असून पक्षांबरोबरच उमेदवार देखील आपला प्रचार करण्यात व्यस्त आहेत. निवडून येण्यासाठी उमेदवाराकडून मोठमोठी आश्वासने दिली जातात. असाच प्रकार हरियाणामधील फतेहाबाद येथे घडला आहे. येथील एका भाजपा उमेदवाराने ”मला आमदार बनवा आणि नशापाणी, शिक्षण, वाहनांवरील दंड यांची चिंता करणे सोडून द्या,” असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सध्या हा उमेदवार मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

हरियाणामधील फतेहबादचे भाजप उमेदवार दुदाराम बिश्नोई यांनी प्रचारादरम्यान, मतदारांना संबोधित करताना म्हटले कि, मला तुम्ही येथून मला आमदार म्हणून निवडून द्या, त्यामुळे तुमची नशापाणी, शिक्षण, वाहनांवरील दंड यांची चिंता दूर होणार असल्याचे म्हटले आहे. तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सर्व सुटतील असेही यावेळी म्हटले. दूदाराम बिश्नोई हे काँग्रेस नेते कुलदीप बिश्नोई यांचे चुलत भाऊ असून त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून येथे सध्या भाजपची सत्ता असून सलग दुसऱ्यांदा सत्तेवर येण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

visit : policenama.com 

You might also like