रेमडीसिवीर आणि वाढीव ऑक्सीजन ची लवकरात लवकर उपलब्धता करा : खा. डॉ भारती पवार

लासलगाव – पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे सुरू झालेले थैमान आणि त्यातच कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर न मिळणारे रेमडीसीवर इंजेक्शन चा तुटवडा तसेच अपुरा पडत चाललेला ऑक्सीजन चा पुरवठा ह्यामुळे मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे हाल होत आहे. नाशिक मध्ये एवढी भयानक परिस्थिती ह्या कोरोना संक्रमानामुळे निर्माण झाली आहे. ह्या आजरावर रेमडीसीवर इंजेक्शन हे प्रभावी ठरत असल्याने त्याची प्रचंड मागणी वाढली असतांना ते मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना कुठेच मिळत नसल्यामुळे ते हवालदिल झाले आहे. ह्याच धर्तीवर लवकरात लवकर ही रेमडीसीवर ची इंजेक्शने उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी FDA विभागाचे नासिकचे सह आयुक्त भामरे यांचेकडे केली.

वाढत्या रुग्णांची संख्या बघता त्यांना रेमडीसीवर इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून देण्याची व कोरोना बाधित रुग्णांना लागणारा ऑक्सीजन पण अपुऱ्या प्रमाणात असून तोही वाढीव प्रमाणात उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खा.डॉ. भारती पवार यांनी केली. FDA ऑफिस च्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांनी ह्या साठी आंदोलन केले असता त्यांच्याशीही खा. डॉ भारती पवारांनी संवाद साधत लवकरात लवकर ही इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी आपण संबंधित यंत्रणेला सूचित केले असून लवकरच ही रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध होतील असे त्यांनी अश्वाशीत केले असल्याचे आंदोलकांना खा. डॉ भारती पवारांनी सांगितले या बैठकी प्रसंगी सहआयुक्त भामरे , पवार मॅडम, देशमुख , ब्राम्हणकर, स्वातीताई भामरे आदी FDA चे अधिकारी उपस्थित होते.