नागरिकांना विश्वासात घेऊनच पेठांमध्ये मेट्रोचे काम करा, मनसेची महामेट्रोकडे मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

शहराच्या पेठांमधील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय मेट्रोसाठी खोदाईचे काम सुरू करु नये.अशी मागणी निवेदनाद्वारे मनसेचे कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आशीष देवधर यांनी महामेट्रोला केली आहे.

शिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान भुयारी मेट्रो मार्ग राहाणार असून याकरिता मोठ्या प्रमाणात खोदाई केली जाणार आहे.या पट्टयात पेठांमधील जुने वाडे , इमारती आहेत.खोदकामामुळे या वाडा,इमारतींना धोका पोहोचेल.अशी भिती या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आहे.याकरिता महामेट्रोच्या प्रशासनाने नागरिकांशी संवाद साधणे गरजेचे आहे.त्यामुळे लोकांना विश्वासात न घेता खोदाई चालू करु नये आणि पावसाळ्यात खोदकाम स्थगितच ठेवावे. अशी मागणी देवधर यांनी केली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांना मेट्रो द्वारे जोडले जात आहे.या मेट्रो च्या कामाला मोठ्या प्रमाणावर गती मिळाल्याचे चित्र पाहव्यास मिळत आहे.आता मनसेकडून पेठामधून मेट्रोचे काम करताना.नागरिकांना विश्वासात घेऊन करण्याची मागणी केल्याने प्रशासन काय करते.याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.