यंदा ‘कोरोना’मुळे गणेश चतुर्थी घरीच. ‘या’ पध्दतीनं बनवा इको-फ्रेंडली बाप्पा !

पोलीसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 20 ऑगस्ट : यंदा वाढत्या कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गणेश चतुर्थी घरीच साजरी करावी लागत आहे. राज्य सरकारने देखील गणेशोत्सव कसा साजरा करावा, याबाबत काही नियम आणि सूचना सांगितल्या आहे. यातून एकच आहे की वाढत्या कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सरकारने काही उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे आता घरच्या घरीच इको फ्रेंडली बाप्पा बनवून गणेश चतुर्थी साजरी करायला हवी. तर घरी इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवण्याचा सोपा मार्ग काय आहे, आपण जाणून घेऊ.

दरवर्षी गणेशोत्सव हा सण देशात जल्लोषात साजरा केला जातो. या निमित्ताने भाविक गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून त्यांची पूजा करतात. पण, यंदा कोरोनामुळे हा उत्सव प्रत्येकवर्षीपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. यासाठी कुठेही गर्दी न करता आणि कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठीचे भान ठेवणे आवश्यक आहे.

यंदा 22 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. पण, यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केवळ चार फूट उंचीची मूर्ती बसविता येणार आहे. तर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम देखील पाळावे लागणार आहेत.

अशा परिस्थितीत भाविकांनी निराश आणि अस्वस्थ न होता तर घरीच सुरक्षित रहावे. बाजारपेठेत गणेश मूर्ती मिळो अथवा न मिळो, पण आपण निश्चितपणे घरी इको-फ्रेंडली मूर्ती बनवू शकता. आता आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आपण घरी सहजपणे गणपतीची मूर्ती कशी बनवू शकता?. इको फ्रेंडली गणेश मूर्ती कशी बनवायची हे जाणून घेऊ पुढीलप्रमाणे :

घरी गणेश मूर्ती तयार करण्यासाठी या वस्तूंची गरज आहे.
क्ले म्हणजेच चिकण माती, पाणी, टूथपिक,

अशाप्रकारे बनवा बाप्पाची मूर्ती :
चिकण मातीमध्ये पाणी टाकून ती घट मळून घ्यावी.
मातीपासून मूर्तीचे भाग बनवा. एका तुकड्याने मूर्तीचा बेस तयार करावा. हात, पाय, सोंड, धड, कान आणि चेहरा बनवावा.
यानंतर तयार केलेले हे सर्व शरीराचे भाग जोडून घ्यावेत.
त्यानंतर चिकणमातीसह वक्र आकारात सोंड बनवा आणि ती चेहर्‍याच्या मधोमध जोडावी.
गणपतीच्या मूर्तीसाठी हात बनवावा आणि ते दोन्ही बाजूला जोडावा.
यानंतर, लहान आकाराचे चिकण मातीपासूनच डोळे आणि कान बनवून ते मूर्तीवर लावावे. मग, तयार होईल तुमचा इको-फ्रेंडली गणपती.