केस गळतीची समस्या ? तयार करा घरगुती हेयर टॉनिक, मिळतील अनेक फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बाह्य सौंदर्यासाठी आपण चेहऱ्याबरोबर केसांचीही निगा राखतो. यासाठी अनेकदा महागडे उपचारही केले जातात. दरम्यान, केस गळतीची अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे योग्य कारण जाणून मग उपचार करणे कधीही चांगले. जर केस वातावरणातील बदल किंवा केसांच्या काही समस्येमुळे गळत असतील तर त्यासाठी महागड्या उपचारांची गरज नाही. यासाठी एक साधा आणि घरगुती उपाय आहे. महत्वाचे म्हणजे याचा आरोग्यावर आणि सौंदर्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

घरगुती हेअर टॉनिकसाठी

या हेअर टॉनिकसाठी आपल्याला मेथीच्या बिया आणि तिळाच्या तेल लागेल. या दोन्ही गोष्टी केसांसाठी फायदेशीर मानल्या जातात. कारण त्यात केसांच्या वाढीसाठी उपयुक्त घटक असतात. यामुळे केस गळती थांबतेच परंतु त्याचबरोबर केसांची जोमाने वाढ होते.

पद्धत

– एका भांड्यात तिळाचे तेल घेऊन ते गॅसवर गरम करा. तुम्हाला जितकं तेल हवं तितकं तेल घेऊन तुम्ही ते साठवून ठेवू शकता.

– तेलाच्या अंदाजानुसार मेथीच्या बिया त्या गरम तेलात टाका. या बिया तेलात चांगल्या गरम होऊ द्या

– तेल गरम झाल्यावर आणि बियांचा अर्क त्यात गेल्यामुळे तेलाचा रंग बदलून ते थोडे गडद रंगाचे दिसेल.

– आता गॅस बंद करून तेल थंड होऊ द्या.

– तेल थंड झाल्यावर गाळणीने गाळून घ्या

– हे गाळलेले तेल तुम्ही एका स्वच्छ बाटलीत भरून ठेवू शकता

– हे हेअर टॉनिक तुमच्या केसांसाठी वरदान आहे.

हेअर टॉनिकचा वापर :

– हे हेअर टॉनिक एका छोट्या वाटीत घ्या आणि कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांना लावून हलक्या हाताने मालिश करा.

– यानंतर केस गरम पाण्यात बूडवुन घट्ट पिळलेल्या टॉवेलने गुंडाळून ठेवा

– आता अर्ध्या तासानंतर केस शॅंम्पूने धुवा.

हेअर टॉनिकचा फायदा :

– मेथी आणि तिळाच्या तेलामुळे केसांची मुळं मजबूत होतात

– केसांना फाटे फुटणे, कोंडा होणे अशा अनेक समस्या हा हेअर टॉनिकमुळे कमी होऊ शकतात

– या हेअर टॉनिकमुळे केस गळणे थांबून केसांची वाढ होऊ लागते

– नियमित मेथीचे हेअर टॉनिक वापरल्यामुळे केस लांब आणि चमकदार होतात

– मेथीच्या हेअर टॉनिकमुळे केसांना योग्य पोषण मिळते ज्यामुळे तुमच्या स्काल्प आणि केसांच्या समस्याा कमी होतात