लखनऊ लागलंय भाजपच्या मागे, मोदींच्या जागी हवे योगी !

लखनऊ : वृत्तसंस्था –  काल झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजप बॅकफूट वर गेली असून त्यापैकी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर लखनौमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा असे पोस्टर लागले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना नावाच्या एका संघटनेने हे पोस्टर लावले असून योगींना आणा, देश वाचवा असा संदेश त्यावर लिहिला आहे. या संघटनेने पुढच्या वर्षी १० फेब्रुवारीला लखनौमध्ये एका धर्म संसदेचे आयोजन केले आहे.

योगीनां उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री केल्यानंतर राजकीय वर्तुळात योगी हेच भाजपा चे पुढचे पंतप्रधान पदाचे दावेदार असतील अशी चर्चा चालू झाली होती. त्यातच आता योगी आणा, देश वाचवा या संदेशाच्या बाजूला #Yogi4PM हा हॅशटॅग दिला आहे. या पोस्टरमधून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे. मोदींना जुमलेबाज ठरवण्यात आले असून योगी हिंदुत्वाचे ब्रँड आयकॉन असल्याचे म्हटल आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरुन आदित्यनाथांचे कौतुक करताना मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. अमित जानी नावाच्या व्यक्तीने हे पोस्टर लावले आहेत. अमित जानी हा उत्तर प्रदेशातील एक कुख्यात गुंड असून लखनौमध्ये मायावतीची मूर्ती पाडून एका रात्रीतून प्रसिद्ध झालेला हा माणूस सपा कडून लोकसभा निवडनुक लढवणार असल्याचे ही बोलले जाते, महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर जो अत्याचार केला जातो त्याच्या विरोधात म्हणून अमित जानी ने उत्तर प्रदेश नवनिर्माण सेना हि संघटना उभी केली आहे.

योगींना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केले नाही तर हिंदू भाजपाला मतदान करणार नाही असा ठराव धर्म परिषदेत करण्यात येईल असे अमित जानीने सांगितले. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात योगी आदित्यनाथ यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भर देऊन जोरदार प्रचार केला. मध्य प्रदेशातील एका सभेत योगींनी अली आणि बजरंग बली यापैकी एकाची निवड करा असे मतदारांना आव्हान केले होते.

हिंदुत्व बाजूला ठेऊन विकासाचा मुद्दा उचलून धरल्यामुळे भाजपाला पराभव पाहावा लागला असे भाजपाच्या काही समर्थकांचे मत आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन तशी आपली नाराजीही प्रगट केली. निवडणुकीत विजयासाठी विकास आवश्यक आहे, पण तितके पुरेसे नाही. विकासाचा अभाव हिंदुत्वाने भरुन काढता येऊ शकतो असे राज्यसभेतील भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले.