ऑनलाईन शॉपिंग : ‘या’ गोष्टींची काळजी नक्की घ्याच अन्यथा तुमचीही होऊ शकते ‘फसवणूक’

पोलीसानामा ऑनलाईन टीम : आजकालच्या वेगवान जीवनशैलीत अनेकजण खरेदीसाठी ऑनलाइन शॉपिंग चा पर्याय वापरताना दिसतात. कपडे, घरातील राशन इत्यादी छोट्या गोष्टींपासून तर टीव्ही, फ्रीज सारख्या महागडी उपकरणे देखील लोक ऑनलाइन पद्धतीने विकत घेण्यालाच प्राधान्य देतात. लोकांची वाढती मागणी पाहून काही कंपन्या आपली उत्पादने डायरेक्ट ई-कॉमर्स वेबसाइट्स वरच लॉन्च करत आहेत. परंतु ऑनलाइन शॉपिंग च्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना देखील मागील काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.

आपण ऑनलाईन पद्धतीने खरेदी करत असाल तर आपलीदेखील फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. थोडीशी चूकदेखील तुमचे बँक अकाउंट रिकामे करू शकते. फसवणुकीपासून वाचण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे त्या पुढीलप्रमाणे :

१. बनावट वेबसाइट पासून सावध रहा :
देशात जवळपास १०० पेक्षाही अधिक ई-कॉमर्स वेबसाईट कार्यरत आहेत. यातील काही कंपन्यांशी ग्राहक चांगल्या प्रमाणात परिचित आहेत तर काही मात्र केवळ फसवणुकीची कामे करतात. बऱ्याचवेळा अशा वेबसाईट्स वर उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते. ऑर्डर केल्यानंतर पैसे तर कापले जातात मात्र उत्पादन येतच नाही अथवा भलतेच उत्पादन मिळते. यानंतर ग्राहकांच्या हातात पश्चातापाशिवाय काहीच राहत नाही. त्यामुळे अशा वेबसाईट्स पासून सावधान.

२. उत्पादनाच्या अधिकृत वेबसाइटला द्या प्राधान्य :
ई-कॉमर्स वेबसाइट शिवाय उत्पादन करणाऱ्या कंपनीची स्वतःची अधिकृत वेबसाइट असेल तर त्यावरून खरेदीस नेहमी प्राधान्य द्यावे. येथे आपल्याला खात्रीशीर उत्पादनही मिळेल आणि आपले पैसेही सुरक्षित राहतील.

३. सेव्ह डिटेल्स च्या ऑप्शन ला ‘नो’ म्हणा :
शॉपिंग च्या वेळी पेमेंट करताना जेव्हा आपन एटीएम कार्ड ची माहिती टाकत असता तेव्हा आपल्याला save card details चा ऑप्शन दाखवला जातो. बऱ्याचदा आपण त्याला होकार देत OK किंवा Yes वर क्लीक करतो मात्र तसे न करता No सिलेक्ट करावे. याने आपली गोपनीय माहिती सुरक्षित राहील.

४. कॅश ऑन डिलीव्हरी चा पर्याय सर्वाधिक सुरक्षित :
ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्याचा सर्वात सुरक्षित पर्याय आहे आपले उत्पादन हातात आल्यानंतर पैसे देण्याचा. जर कोणतेही उत्पादन विकत घेताना तुम्हाला ‘कॅश ऑन डिलीव्हरी’ या पर्यायाची सुविधा मिळत असेल तर तुम्ही तो पर्याय स्वीकारावा. यात फसवणुकीची शक्यता कमी असते.

५. उत्पादन विकत घेण्याआधी विक्रेत्याची माहिती जाणून घ्यावी :
आपल्यातील बऱ्याच जणांना माहित असेल कि ई-कॉमर्स कंपन्या स्वतः उत्पादने विकत नाही तर त्यांच्या माध्यमातून इतर अनेक विक्रेते सामान विकत असतात. त्यामुळे सामान खरेदी करताना विक्रेत्याची माहिती आणि इतर ग्राहकांनी त्याला दिलेले रेटिंग्स पाहूनच उत्पादन विकत घ्यायचे कि नाही ते ठरवावे.

६. याशिवाय ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स कंपन्या काही उत्पादने विकताना त्यांची खात्री देतांना त्या उत्पादनांनसोबत फुलफिल्ड किंवा अशुअर्ड सारखे लेबल लावतात. असे लेबल असेल तर ते उत्पादन खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. अशावेळी योग्य उत्पादन तुमच्यापर्यंत पोहोचण्याची खात्री असते.

७. उत्पादनासंदर्भात इतर ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रिया अथवा रिव्हिव्ह :
प्रत्येक उत्पादन तुमच्याआधी विकत घेतलेल्या आणि वापरलेल्या ग्राहकांच्या त्यासंबंधी प्रतीक्रिया आणि रिव्हिव्ह संबंधित वेबसाईटवर उपलब्ध असतात. हे सर्व पाहूनच सकारात्मक प्रतिक्रिया असणारे उत्पादन खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे.

या सर्व गोष्टींची काळजी ऑनलाईन शॉपिंग करताना घेतल्यास तुम्ही फसवणुकीतून नक्कीच वाचू शकाल.
आरोग्यविषयक वृत्त-
भारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल
लहान मुलांनाही शिकवा ही “योगासन” होतील फायदे
लहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय
मानसिक आरोग्य जपण्यासाठी झोप आहे महत्वाची