‘मेकअप’ आणि ‘ब्युटी’ प्रॉडक्टमध्ये असतात ‘हे’ 6 हानिकारक केमिकल्स, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आजकाल मेकअप प्रॉडक्ट वापरणं ही एक कॉमन गोष्ट झाली आहे. याच मेकअप प्रॉडक्टमध्ये अनेक घातक घटक असतात. आपल्या स्किनमधून हे घटक आपल्या शरीरात जातात ज्यामुळे आपल्याला अनेक आजार होतात. याच बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) क्लोसन-
टूथ पेस्ट, साबण आणि इतर काही ब्युटी प्रॉडक्टमध्ये साधारपणे हे केमिकल आढळून येतं. हे केमिकल आपल्या एंडोक्राईनसाठी हानिकारक आहे. यातील दुसरा हानिकारक घटक आहे लिपोफेलिक. हे साबण वापरण्याऐवजी हँडमेड साबण वापरणं कधीही योग्य.

2) पॅराबेन्स-
कॉस्मेटीक्स आणि मेकअप आयटममध्ये सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे. याचा वापर प्रॉडक्टची शेल्फ लाईप वाढवण्यासाठी केला जातो. हा घटक डीएनएसाठी घातक आहे.

3) थलैट-
कंस्ट्रक्शन मटेरियल व पेस्टिसाईड यांसारखे उत्पादन बनवण्यासाठी वापर केला जाणारं थलैट, ब्युटी व हेल्थकअर इंडस्ट्रीत जास्त प्रमाणात वापरलं जातं. याचा वापर नेल पॉलिशची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी आणि हेअर स्प्रेमध्ये केला जातो. यामुळे अस्थमा, डायबिटीज आणि मेटाबोलिक आजारांचा धोका जास्त असतो.

4) ऑक्सिबेन्जोन-
सनस्क्रीनमध्ये या हानिकारक केमिकलचा वापर केला जातो. फूलांमध्ये हा घटक नैसर्गिकरित्या असतो. हे केमिकल कोरल रीफसाठी धोकादायक आहे.

5) लेड-
याचा वापर थेट लिपस्टिकमध्ये केला जात नाही. लाल, ऑरेंज, ब्राऊन लिपस्टिक बनवण्यासाठी सिंथेटीक आयरन ऑक्साई़डचा वापर केला जातो. यामुळे शरीरात वारंवार मेटल जातं. यामुळे लेड पॉईजनिंग होण्याचा धोका असतो.

6) सोडियम लॉरेथ सल्फेट-
आपल्या स्कीनवर आपण जे काही लावतो ते 60 टक्क्यांपर्यंत अ‍ॅबसॉर्ब केलं जातं. हे केमिकल आपल्या ब्लडलाईनमध्येही जातात. याचा वापर टूथपेस्ट, शॅम्पू, चेहऱ्याची क्रिम बनवण्यासाठी केला जातो. यामुळे स्कीनवर जळजळ होऊ शकते.