‘त्या’ दुर्घटनेमुळं माझा दृष्टीकोन बदलला, ही अभिनेत्री माझी ‘प्रेरणा’ ; संजय लीला भन्साळीच्या भाचीचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मेरी कोम, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत यांसारख्या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या शर्मिन सहगलचा अभिनेत्री म्हणून पहिलाच सिनेमा मलाल येत्या शुक्रवारी (५ जुलै) रोजी रिलीज होणार आहे. संजय लीला भंसाळी यांची भाची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शर्मिन सहगलला अभिनयाव्यतिरीक्त दिग्दर्शन आणि सिनेमाच्या निर्मितीचेही काम करायचे आहे. याबाबत तिने स्वत: अनेक प्रश्नांची उत्तरे देत काही खुलासे केले आहेत.”

संजय लीला भंसाळी सोबत मामा-भाचीचं नातं एक कलाकार आणि सर म्हणून कसं पुढे आलं ?

शर्मिन म्हणते की, “जेव्हा ११ वर्षांची होते तेव्हाच त्यांची भाची होते. एका वयानंतर मी त्यांच्या कामाला समजून घ्यायला सुरुवात केली त्यानंतर मला समजलं की, हिंदी फिल्म इंडस्ट्रीत त्यांचं स्थान काय आहे. कधी कधी तर मला असं वाटतं की, त्यांनी देवदास सारखा सिनेमा कसा बनवला असेल. एका वयानंतर त्यांच्यासाठीचा आदर आपोआपच वाढत जातो. मी जेव्हा कुटुंबियांसोबत असते तेव्हाही त्यांना संजय सरच म्हणते.”

Malaal set

जेव्ही तुझी ओळख संजय लीली भंसाळीची भाची अशी केली जाते तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय असते ? 

शर्मिन म्हणते, “मी संजय लीला भंसाळींची भाची आहे आणि राहणारच आहे. माझे नाव त्यांच्यासोबत जोडले गेले आहे हे मी स्वत: निवडलं नाहीये. माझं नाव शर्मिन आहे लोकं हे नावंही चुकीच्या पद्धतीने घेतात. एक अभिनेत्री म्हणून मी ते सर्व काही आहे जे प्रेक्षक माझ्याबद्दल विचार करतात. प्रत्येक प्रेक्षकाचा एक वेगळा दृष्टीकोन असतो. मला या सिनेमानंतर लोक भाचीच म्हणत असतील तर माझी काहीच हरकत नाही.”

संजय सरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

शर्मिन म्हणते, “मी त्यांच्यासोबत काम केलेला पहिला सिनेमा होता मेरी कॉम, यानंतर होता बाजीराव मस्तानी. प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की, त्यांच्यासोबत काम करावं, तसंच माझंही आहे. परंतु त्यासाठी पात्र होण्याआधी मला तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. यासाठी मी या सिनेमांवर काम केलं. कारण मला फिल्म मेकींग शिकता यावं. मी अॅक्टींग स्कुलमध्येही तेच शिकले ज्याची गरज होती. मला त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायचं आहे.”

Malaal

वंशवादाच्या प्रश्नांना कशी सामोरी जातेस ?

शर्मिन म्हणते की, “सिनेमात वंशवाद आहे आणि हे नाकारून चालणार नाही. परंतु प्रत्येक कलाकार केवळ वंशवादामुळे काम करत आहे असे नाहीये. करिअरच्या सुरुवातीच्या काळात भलेही याची मदत होत असेल परंतु तुमची मेहनतच तुमचं भविष्य ठरवत असते. तुमचं भविष्य तुमचं परिवारही ठरवू शकत नाही. ”

तुझ्यासोबत अनेक दुर्घटना घडल्या आहेत, सर्वात मोठी दुर्घटना कोणती ?

शर्मिनने सांगतिले की, “आतापर्यंत माझ्या सोबत ६ दुर्घटना घडल्या आहेत. सर्वात खतरनाक दुर्घटना पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत शिकायला गेले होते तेव्हा घडली होती. एक अपघात झाला होता. हा अपघात इतका भीषण होता की, मला प्रश्न पडतो की, मी जिवंत कशी आहे. धडाम असा जोरात आवाज आला आणि मी डोळे उघडले तेव्हा थेट हॉस्पिटलमध्ये होते. जान्हवी तेव्हा सोबत होती. यानंतर आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला. मलालच्या सेटवरही बाईकमध्ये पाय अडकल्याने मी दूरवर फरपटत गेले. परंतु दुसऱ्या दिवशी पाच वाजता मी सेटवर हजर होते. प्रत्येक दुर्घटनेसोबत मी आणखीच मजबूत होत गेले.”

sharlin

या सिनेमानंतर पुढे काय ?

शर्मिन म्हणते, “मला प्रत्येक प्रकारचा सिनेमा करायचा आहे. माझी प्रेरणा प्रियंका चोपडा आहे. मला तिच्यासारखे रात्रंदिवस काम करायचे आहे. दिग्दर्शन, निर्मिती, लेखन आणि अभिनय सर्वकाही करायचे आहे. अभिनय माझी पॅशन आहे. एका बिंदूवर पोहोचल्यानंतर मला दिग्दर्शनही करायचे आहे.”

पावसाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी आहारामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

एकाच वेळी अनेक लॅबमध्ये काम करणाऱ्या पाच पॅथॉलॉजिस्टचा परवाना रद्द

महाआघाडीच्या अडचणीत वाढ,वंचितनंतर ‘हा’ पक्षही देणार धक्का ?

रोहित पवार या मतदारसंघातून लढणार

 

You might also like