अरमानच्या रिसेप्शनमध्ये ‘अर्जुन-मलायका’नं एकत्र घेतली ‘एन्ट्री’, फोटोग्राफर म्हणाला ‘असं’ काही, चिडून निघून गेला अर्जुन (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या सर्वात चर्चित कपलपैकी एक असणाऱ्या अभिनेत्री मलयाका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या नात्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं आहे. परंतु लग्नाच्या बाबतीत विचारलं असता ते सांगतात की, या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांना वेळ हवा आहे. नुकतचे दोघे करीना खपूरचा कझिन अरमान जैनच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये आले होते.

मलायकानं छान रेड साडी घातली होती ज्यात ती खूप हॉट दिसत होती. अर्जुननंही ग्रीन कलरची शेरवानी घातली होती. एकत्र एन्ट्री घेतल्यानंतर फोटोग्राफर्सने जेव्हा फोटोसाठी पोज द्यायला सांगितलं तेव्हा त्यांनी पोजही दिली. परंतु जेव्हा एक फोटोग्राफर म्हणाला की, जोडीनं पोज द्या. तेव्हा अचानक अर्जुन बाजूला निघून गेला. त्याचं काहीतरी बिनसल्या सारखं वाटलं. तो काही अंशी नर्व्हस वाटत होता. सध्या अर्जुनच्या अशा रिॲक्शचा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. सोबत फिरताना ते अनेकदा स्पॉट झाले आहे. परंतु लग्नात अर्जुननं अशा प्रकारे रागवल्यासारखं का बिहेव केलं हे मात्र कोणालाही कळलं नाही.