मलायका-अर्जूननं घेतली ऋषी कपूरची भेट, नीतूनं केली अशी कमेंट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा न्यूयॉर्कमध्ये हॉलिडे एन्जॉय केल्यानंतर आता पुन्हा मुंबईत आले आहेत. न्यूयॉर्कमध्ये अर्जुन कपूर आणि मलायकाने अभिनेता ऋषी कपूरचीही भेट घेतली. दोघांनीही ऋषी कपूर सोबत स्पेशल टाईम स्पेंड केला. मलायकाने तिच्या इंस्टग्रामवरून फोटोही शेअर केला आहे. या फोटोत मलायका, नीतू, अर्जुन आणि ऋषी कपूर दिसत आहेत.

मलायकाने शेअर केला ऋषी कपूर सोबत फोटो

या खास फोटोला मलायाकाने कॅप्शन देत सर्वांचे आभार मानले आहेत. मलायकाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “Thank u @neetu54 n Rishi uncle for such a warm n lovely evening #Nyc.”

मलायकाच्या या ग्रुप फोटोवर नीतूनेही कमेंट केली आहे. आपल्या कमेंटमध्ये त्या म्हणतात की, “घरातील मुले अर्जुन कपूर आणि मलायका सोबत छान संध्याकाळ गेली. धन्यवाद.” नेहमीप्रमाणे मलायका आणि अर्जुन कपूरचा हा फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

मलायकाने अर्जुनसोबत नाते केले ऑफिशियल

मलायका आणि अर्जुन नुकतेच न्यूयॉर्कला हॉलिडेसाठी गेले होते. तिथे मलायकाने अर्जुन कपूरचा बर्थडे सेलिब्रेटही केला. अर्जुनच्या वाढदिवशीच मलायकाने अर्जुन कपूरसोबतचे नाते ऑफिशियल केले. आपल्या प्रेमाबद्द तिने कबुली दिली. तिने इंस्टाग्रामवर अर्जुन कपूरसोबत फोटो शेअर केला होता. अर्जुन-मलायकाचे न्ययॉर्क व्हॅकेशनचे अनेक फोटो समोर आले होते जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

‘या’ सिनेमातून ऋषी कपूर यांची पडद्यावर वापसी

ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगायचे झाले तर, मोठ्या कालावधीपासून ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये पत्नी नीतू कपूरसोबत आहेत. न्यूयॉर्कमध्ये ते कॅन्सरवर उपचार घेत आहेत. ऋषी कपूर यांच्या तब्येतीत आता बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. ते लवकरच मुंबईत परत येऊ शकतात. अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांना भेटण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये गेले होते. वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, मोठ्या कालावधीनंतर ऋषी कपूर ‘झूठा कही का’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये वापसी करणार आहे. या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. ऋषी कपूर यांनी पूर्वीच याची शुटींग केली होती.

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय