मलायका अरोरानं ‘शिमरी’ गाऊनमध्ये दिसली एकदम ‘स्टनिंग’ !

पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरसमुळं जरी देशात लॉकडाऊन लागू झाला असला तरी बॉलिवूड सेलेब्स मात्र चाहत्यांसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. सर्वच कलाकार सध्या घरात बंद आहेत. बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या हॉट फोटोंमुळं नेहमीच चर्चेत येताना दिसत असते. मलायका देखील सध्या घरातच टाईम स्पेंड करताना दिसत आहे. सोशलवर सक्रिय असणाऱ्या मलायकाचे काही फोटो समोर आले आहेत ज्यांनी लक्ष वेधलं आहे.

मलायकाचे इंस्टावरून काही फोटो शेअर करण्यात आले आहेत ज्यात ती स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. मलायका आपल्या स्टाईल आणि फॅशनसाठीही फेमस आहे. तिची स्टायलिस्ट मेनका हरिसिंघानी हिनं मलायकाचे स्टनिंग फोटो तिच्या इंस्टावरून शेअर केले आहेत.

मलायकाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ATELIER ZUHRA च्या कलेक्शनमधून शिमरी सिल्व्हर कलरचा गाऊन घातला आहे. यात ती खूपच स्टनिंग आणि ग्लॅमरस दिसत आहे.

मलायकानं स्मोकी आयमेक आणिन्यूड लिपस्टिक लावली आहे. तिनं केस मोकळे सोडल्यानं तिच्या सौंदर्यालाही चार चांद लागले होते यात शंका नाही. मलायकाचे हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

@malaikaaroraofficial @toni_maticevski 🖤

A post shared by Maneka Harisinghani (@manekaharisinghani) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like