बाबो …! मालयकाचा मुंबईच्या रस्त्यांवर चक्क ऑटोरिक्षातून फेरफटका 

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – मलायका आणि अर्जुन कपूरच्या अफेअरच्या जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये रंगल्या आहेत. हे दोघे मुंबईत एकत्र भटकताना सारखे स्पॉट होत आहेत. आता मलायका कोणत्या आलिशान कारमधून नाही तर ऑटोरिक्षातून मुंबईच्या आलिशान रस्त्यावर फेरफटका मारताना दिसली. विशेष म्हणजे या रिक्षात अँपल चा लोगो होता म्हणूनच नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे.  मलायकाचा ऑटोसुद्धा Apple ब्रॅण्डचा आहे असे सध्या नेटकरी तिला म्हणतायत.
ख्रिसमस पार्टीला मलायका -अर्जुन एकत्र 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री दिग्दर्शक रितेश सिधवानी यांनी त्यांच्या घरी प्री-ख्रिसमस पार्टीत मलायका अर्जुन कपूरसोबत पोहोचली होती. खास गोष्ट म्हणजे जेव्हा मलायका अर्जुन कपूरसोबत ज्या कारमध्ये होती त्याच कारमध्ये अर्जुनचे काका-काकू संजय कपूर आणि महीप कपूरसोबत सोबत होते. मलायकाची अर्जुनच्या काका-काकूंसोबत चांगली बाँडिंग दिसली. बातम्यांनुसार, अर्जुन आणि मलायका पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न करु शकतात. पार्टीत अरबाज त्याची गर्लफ्रेंड जॉर्ज‍ियासोबत पोहोचला होता. सोबतच अमृता अरोरा, रणवीर सिंह, जोया अख्तर, फरहान अख्तर, शिबानी दांडेकर, तुषार कपूर यांनीही हजेरी लावली होती.
गेल्यावर्षी हॉलिडेवर गेले होते मलायका-अर्जुन
मलायकाने तिचा ४५ वा बर्थडे (२३ ऑक्टोबर) सेलिब्रेट करायला इटलीत गेली होती. या हॉलिडेवर अर्जुन कपूर तिच्यासोबत होता. इटलीहून अर्जुन आणि मलायकाचा एक फोटो समोर आला होता, त्यामध्ये दोघे हातात हात घालून फिरताना दिसले होते. हा फोटो मिलान (इटलीतील शहर) एअरपोर्टचा होता.

फोटो समोर आल्यानंतर दोघांच्या अफेअरची जोरदार चर्चा सुरु झाली होती. व्हेकेशनहून परतत असताना दोघे एकाच फ्लाइटने भारतात परतले होते. पण मुंबई एअरपोर्टवर फोटोग्राफर्सना बघून दूर दूर झाले होते.