‘बिकीनी’ फोटो ते ‘अंडर आर्म्स’ दाखवण्यापर्यंत, मलायकाला हिनवणार्‍यांनी केलं ‘असं’ ट्रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा बी टाऊनमधील सर्वात चर्चित आणि ग्लॅमरस अ‍ॅक्ट्रेस मानली जाते. आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटो-व्हिडीओंमुळे ती चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. परंतु यामुळे ती अनेकदा ट्रोल झाली आहे. आपण हे जाणून घेणार आहोत की, केव्हा केव्हा मलायका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती.

2017 साली मुकेश अंबानींच्या घरी पेज 3 पार्टी ठेवण्यात आली होती. या पार्टीत मलायकाने ब्लॅक वेलवेट कोरसेट ड्रेस घातला होता. मलायकाने हा फोटो शेअर केल्यानंतर ती ट्रोल झाली होती.

एका युजरने कमेंट केली होती की, “हा ड्रेस एका आईला सूट करत नाही. आणखी एकाने लिहले होते की, “तू किती किलोचा मेकअप केला आहेस.” याव्यतिरिक्त अनेक आक्षेपार्ह कमेंट होत्या.

View this post on Instagram

Jus…..coz I ♥️it…. @manishmalhotra05 @mehakoberoi

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

25 मे 2018 रोजी मलायकाने आपल्या इंस्टाग्रामवरून काही बिकीनी फोटो शेअर केले होते ज्यामुळे ती ट्रोल झाली होती. फोटोत मलायका पाण्याच्या आत दिसत होती.

मलायकाच्या या फोटोवर एकाने कमेंट केली होती की, “एक आई बिकीनी घालून इंस्टावर फोटो कसे शेअर करू शकते.” काहींनी म्हटलं होतं की, “इतकं चीप नको वागूस” तर काहींनी म्हटलं होतं टीनएजर सारखं वागू नकोस. काहींनी म्हटलं आपला चेहरा पाहिला आहेस का.

मलायकाने 10 जून 2019 रोजी सोशलवर योगाचे फोटो शेअर केले होते. यावर काही युजर्सने अश्लील कमेंट करत तिला ट्रोल केलं होतं.

मलायकाने 29 मे 2019 रोजी आपला एक बोल्ड फोटो शेअर केला होता. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत मलायका खूपच स्टनिंग दिसत होती. काहींनी तिला या फोटोमुळे ट्रोल केले होते. या फोटोत तिच्या आर्मपीटमध्ये केस दिसत होते. यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली होती.

View this post on Instagram

#bts….

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

View this post on Instagram

Middle of nowhere…

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like