अगं बाई ! ‘अर्जून’चा स्टेजवर फोटो बघताच ‘लाजली’ बिनधास्त मलायका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड म्हटले की ग्लॅमरस अभिनेत्री आणि अभिनेते यांची चर्चा सतत होत असते. तसेच त्यांच्यातले रिलेशन आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चाहत्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. अशाच अभिनेत्रींपैकी सध्या चर्चेत आहे असलेली अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका अरोरा ही आपल्या बोल्ड फोटोशूटमुळे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. मलायका नेहमीच आपल्या बोल्ड फोटोशूट आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

सध्या मलायका अरोरा चर्चेत आली आहे. याचे कारण आहे अर्जुन कपूर. अर्जुन कपूर व मलायकाचे अरोरा यांचे नाते आता कुणापासूनच लपून राहिलेले नाही. काही महिन्यांपूर्वी दोघांनीही आपले नाते जगजाहिर केले होते. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये मलायकाला अर्जुनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तर अर्जुनचे नाव ऐकल्याबरोबर मलायका चक्क लाजली. आणि तिचा चेहरा अर्जुनचे नाव ऐकताच लाजेने लाल झाला. त्यामुळे त्यांच्याबद्दल होणाऱ्या चर्चेस अधिक भर पडली आहे.

हा प्रसंग मुंबईत पार पडलेल्या फिल्मफेअर अवार्ड सोहळ्यातला आहे. या सोहळ्यात मलायका अरोरास ‘दीवा ऑफ द इअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मलायका पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर गेली असता होस्ट सोफी चौधरी हिने मलायकाला अर्जुनबद्दल प्रश्न केला. ‘ तू तुझ्या एका स्पर्शाने कुणालाही कसे ‘दीवा’ बनवू शकतेस? यावेळी बॅकग्राउंडला अर्जुन कपूरचा फोटो होता लावला होता. अर्जुनचा तो फोटो बघून मलायका चक्क लाजली. आणि मी यावर हसू की उत्तर देऊ, असे लाजत ती म्हणाली. यानंतर ‘तो माझ्यापेक्षा मोठा दीवा आहे,’ असे मलायका म्हणाली. त्यावेळेस तिचा चेहरा लाजेने लालबुंध झाला होता. मलायकाचे हे उत्तर ऐकून उपस्थितांनामध्ये हशा पिकला.

या इव्हेंटमध्ये मलायकाच्या मिरर ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मलायका अरोरा सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका त्यांच्या रिलेशनमुळे अनेकदा ट्रोल देखील झाली आहे. कारण मलायका आणि अर्जुन यांच्यात तब्बल ११ वर्षांचे अंतर आहे. अर्जुन मलायका पेक्षा ११ वर्षांनी लहान असल्यामुळे मलायका ट्रोल झाली होती परंतु मलायकाने याची कधी पर्वा केली नसून तिने आपले रिलेशन टिकवून ठेवले आहे.