‘बोल्ड’नेस राहिला बाजूला अन् अंडरआर्म्सचीच झाली जास्त चर्चा ! ‘तो’ फोटो व्हायरल झाल्यानं मलायका अरोरा पुन्हा एकदा ‘ट्रोल’

बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा आपल्या बोल्ड आणि बिंधास्त फोटोशुटमुळं नेहमीच चर्चेत असते. सोशलवर ती आपल्या हॉटनेस आणि फिटनेससाठी फेमस आहे. कधी मलायका आपल्या फोटोंमुळे चाहत्यांचं मन जिंकते तर कधी तिला ट्रोलर्सचा सामना करावा लागतो. स्टाईल आणि फॅशनच्या नादात मलायका अनेकदा उप्स मुमेंटची (oops moment) शिकारही झाली आहे. मलायकाचा एक बोल्ड पुन्हा चर्चेत आला आहे ज्यामुळं ती ट्रोल होत आहे. तिच्या ट्रोलिंगचं कारण हे बोल्डनेस नाही तर काही औरच आहे.

मलायकाचा एक बोल्ड फोटो सध्या सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. तसं पाहिलं तर हा फोटो जुनाच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलायकानं 29 मे 2019 रोजी हा बोल्ड फोटो शेअर केला होता. या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत मलायका खूपच स्टनिंग दिसत होती. मलायका तेव्हाही या फोटोसाठी ट्रोल झाली होती. आता पुन्हा हा फोटो समोर आल्यानं ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. या फोटोत तिच्या आर्मपीटमध्ये (काखेत) केस दिसत होते. यामुळे ती प्रचंड ट्रोल झाली होती.

असं सांगितलं जात आहे की, मलायकानं एका मासिकासाठी फोटोशुट केलं होतं तेव्हाचा हा फोटो आहे. यात तिच्या काखेतील केस स्पष्ट दिसत आहेत. यावरून ती प्रचंड ट्रोल झाली आहे. कारण फिटनेसह इतर गोष्टींची इतकी काळजी घेणारी मलायका अशा अवतारात दिसली ते काही चाहत्यांना रुचलं नाही.

46 वर्षांची मलायका आजही खूप फिट आणि यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. जीम, योगा असं सारं काही ती करते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसत आहे. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे फिक्या पडतात. मलायका तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. आता दोघांनीही त्यांचं नातं ऑफिशियल केलं आहे.

मलायकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. आजवर मलायकानं अनेक सिनेमात आयटम नंबर केले आहेत जे खूप गाजले आहेत.

https://www.instagram.com/p/B3FXweYhu97/

https://www.instagram.com/p/B6nSvdHpWQF/

https://www.instagram.com/p/CCbGCiJlsMt/