‘कोरोना’ बाधित सापडल्यामुळे मलायका अरोराची इमारत ‘सील’

पोलिसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा राहत असलेल्या इमारतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ही इमारत 8 जून रोजी सील करण्यात आली. यामुळे मलायका मुलगा अरहानसोबत क्वारंटाइनमध्ये राहत आहे.

लॉकडाउनच्या काळात मलायका सोशल मीडियावर सक्रिय आहे. विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. लॉकडाउनदरम्यान मानसिक स्वास्थ राखण्यासाठी ती विविध उपाययोजना करत आहे. या मिळालेल्या वेळात शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी ती खूप प्रयत्न करतेय. फिटनेससाठी ओळखली जाणारी मलायका सध्या घरीच वर्कआऊट करत आहे. चाहत्यांनाही तिने घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्यात बुधवारी 3 हजार 254 करोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. याचबरोबर एकूण संख्या बुधवारी 94 हजार 41 वर पोहोचली. तर नवीन 1 हजार 879 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.