ओव्हर मेकअपमुळे रानू मंडल पाठोपाठ नेटकर्‍यांनी उडवली मलायकाची ‘खिल्ली’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोराची ओळख करुन देण्याची काहीच गरज नाही. कारण मलायका आपल्या फिटनेसमुळे चर्चेत असते. मात्र ती आपल्या लव्हलाईफमुळे आणि त्याचबरोबर आपल्या फॅशन स्टेटमेंटमुळे देखील चर्चेमध्ये असते. मलायका सोशल मीडियावर सगळ्यात अ‍ॅक्टिव्ह अभिनेत्री आहे. ती तिचे सेक्सी आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तुम्ही तिचे इन्स्टा अकाउंट पाहू शकता.

मलायका अरोरा नेहमी तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. मलायका नेहमी तिचे सेक्सी आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करुन चाहत्यांना घायाळ करत असते. तिचे फोटोला हजारो चाहते पसंत करतात. आता पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ करण्यासाठी मलायकाने आपले बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

मलायकाचे इन्स्टाग्राम अकाउंट तिच्या बोल्ड आणि सेक्सी फोटोंनी भरलेले आहे. रोज नवे नवे फोटो शेअर करुन ती चाहत्यांना घायाळ करत असते. नुकतेच मलायकाने फोटो शेअर केला आहे. या फोटोला अनेक युजर्सच्या कमेंट आणि लाइक मिळत आहे. मात्र, काही युजर्सने मलायकाच्या या फोटोला ट्रोल केले आहे.

मलायकाने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये तिने खूप हेवी मेकअप केला आहे. तिचा हा मेकअप युजर्सला आवडला नाही. त्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे. एका युजर्सने तिला कमेंट केली आहे की, ‘तुझ्या चेहऱ्यावर मेकअप आहे की, तू मेकअपवर आहेस?’ असा प्रश्न मलायकाला विचारण्यात आला आहे. इतका मेकअप करुन देखील एक गोष्ट लपवता येत नाही. असे म्हणून युजर्सने मलायकाच्या वयाकडे लक्ष वेधले.

काही दिवसांपुर्वीच सिंगर रानू मंडल देखील त्यांच्या हेवी मेकअपमुळे ट्रोल झाल्या होत्या. यापुर्वी ही मलायका तिच्या फोटोमुळे ट्रोल झाली आहे. चाळीशी ओलांडलेल्या मलायका तिच्यापेक्षा अनेक वर्षे लहान असलेल्या अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यामुळे देखील तिला युजर्सने खूप ट्रोल केले होते. मात्र, यामुळे तिला काहीच फरक पडलेला दिसला नाही.

मलायकाच्या फिटनेसचे चाहते आहेत. वयाच्या ४५ व्या वर्षीही फिटनेस बाबतीत सक्रिय असणारी अभिनेत्री मलायका सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते.

Visit : Policenama.com