Lockdown मध्ये आपल्या कुत्र्यासोबत रस्त्यावर फिरली अभिनेत्री,योगाचे धडे देणार्‍या ‘मलायका’वर भडकले नेटीझन्स; म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारने कडक लॉकडाऊन लागू केला आहे. अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे असे सांगितले गेले आहे. पण अशा परिस्थितीत देखील अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या कुत्र्याला घेऊन रस्त्यावर फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला सोशल मीडियावर युजर्सकडून चांगलेच सुनावले जात आहे.

योगेश शहाने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत मलायका अरोरा तिच्या कुत्र्याला घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तिने मास्क लावलेला दिसत असला तरी ती काहीही कारण नसताना फिरत असल्याने नेटिझन्स चांगलेच संतापले आहेत. सरकार कोरोना रोखण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत असताना या सेलिब्रेटींना काहीही पडलेले नाही, अशी कमेंट करत आहेत. तसेच पाळीव प्राण्यांना फिरवणे हे अत्यावश्यक सेवेत येते का असा प्रश्न देखील सोशल मीडियाद्वारे विचारला जात आहे.