#VideoViral : ‘त्या’ हॉट व्हिडीओमुळे मलायका ट्रोल…अनेकांनी केल्या अश्लील कमेंट्स 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या लग्नाच्या चर्चेमुळे चांगलीच ट्रेंडिंगमध्ये आहे. तिच्या अनेक फोटो  आणि व्हिडीओंमुळे ती चर्चेत असतेच. अनेकदा मलायका तिच्या फोटो आणि व्हिडीओंमुळे ती ट्रोलही होत असते. पुन्हा एकदा मलायका तिच्या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. पुन्हा एकदा मलायका ट्रोल  होताना दिसत आहे. मलायकाने घातलेल्या जिम आउटफिटमुळे ती सध्या ट्रोल होताना दिसत आहे. मलायकाचा नुकताच इन्स्टाग्रामवरील एक व्हिडीओ समोर आला आहे. तो व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी खोचक शब्दात टीका करत मलायकाला ट्रोल केले आहे. अनेकांनी अश्लील भाषेतही कमेंट केली आहे.

मलाकाच्या व्हायरल होत असणारा बांद्र्याचा असल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे.  व्हिडीओत दिसते की मलायका गाडीतून उतरते, तिने बॉडी फीट जीम आउटफीट घातला आहे. गाडीतून उतरताच तिने पोजही दिली आहे.

 

मलायकाचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होताना दिसत  आहे. मलायकाला नेटीझन्सने ट्रोल केले आहे. तिच्या फोटोंवर टीका करत अनेक खोचक कमेंट्स केल्या आहेत. काहींनी तर अगदीच अश्लील भाषेत कमेंट केली आहे. मलायकाच्या व्हिडीओखाली एका युजर्सने म्हटले आहे की, अख्ख्या तरुणाईला बर्बाद करणार आहे ही आंटी.” आणखी एका युजरने म्हटले आहे की, “हे अजिबात चांगले नाही. एक्सपोज करणारे मलायकाचे अनेक फोटो आम्ही पाहिले आहेत.” तर दुसरा युजर म्हणतो की, “स्वत:ला 16 वर्षाची मुलगी समजते ही  आहे ही, बेशरम बाई.” आणखी एकजण खोचकपणे म्हणतो की, “बघा ही म्हातारी कशी बॅक पोज देत आहे.” एकाने म्हटले आहे की, “कपूरला(अर्जुन) फसवल्याचा हा परिणाम आहे.”  काहींनी तर अर्वाच्य भाषेत शिवीगाळदेखील केली आहे.

दरम्यान काही युजर्जने मात्र मलायकाचे कौतुक करत बाजू घेतली आहे. एकाने तर टोलर्सलाच उत्तर दिले आहे. त्याने म्हटले आहे की, “लोक उगाचच मलायकाला तिच्या कपड्यांवरून बोलत आहेत. तिने तिचे जीवन कसे जगायचे हे तिला तिचे ठरवू द्यावे.” तिच्या कमनीय शरीराची स्तुती करत आणखी एकाने म्हटले आहे की, “वा.. या वयातही ही लक्ष वेधून घेते. बॉलिवूडमध्ये इतकी सुंदर फिगर कोणाचीच नाही.”