अभिनेत्री अमृता अरोराच्या पार्टीत महागडा ड्रेस परिधान केल्यानंतर मलायका दिसली फाटलेल्या जीन्समध्ये; चाहत्यांनी केलं ट्रोल

पोलिसनामा ऑनलाईन – पार्टी कोणतीही असो किंवा कोणाचीही असो..यावेळी अभिनेता आणि अभिनेत्री विशिष्ट लूकमध्ये आढळतात. तसेच ते अनेकांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेण्याचाही प्रयत्न करत असतात. मात्र, नेटकर्‍यांनी तसेच चाहत्यांनीही मलायकाला तिच्या ड्रेसवरून ट्रोल केलंय. कारणही तसंच आहे म्हणा….

नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोराच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. ज्यात अनेक नामांकित तारे सहभागी झाले होते. अशा परिस्थितीत अभिनेत्री मलायका कुठे मागे राहतेय.. या पार्टीत मलायका देखील उपस्थित होती.

 

 

यावेळी अभिनेत्री मलायका आणि अभिनेत्री अर्जुन कपूर या पार्टीत दिसले. मात्र, यावेळी अभिनेत्री मलायकाची अप्रतिम शैली पाहायला मिळाली. या पार्टीत तिने परिधान केलेला ड्रेस सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा होता. म्हणूनच… मलायकाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. मात्र,…

 

 

 

 

त्यानंतर मलायका फाटलेल्या जीन्समध्ये दिसली. म्हणून नेटकर्‍यांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका नेटकर्‍यांनं तर म्हंटलं की, ‘इतना पैसा..फिर भी फटेहाल’…, असं म्हणून त्यानं मलायकाच्या फाटक्या जीन्सवर कमेंट पास केली.

 

 

 

बॉलिवूड अभिनेत्री अमृता अरोराच्य या पार्टीत करण जोहर, अभिनेत्री मलाइका अरोरा, अभिनेता अर्जुन कपूर, प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, संजय कपूरची पत्नी महेप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, शाहरुखची पत्नी गौरी खान, अभिनेत्री करिश्मा कपूर, नताशा पूनवाला आणि संजय कपूर आदी सामील झाले होते.