अर्जुन Live चॅटमध्ये सांगत होता त्याचे दैनंदिन ‘शेड्यूल’, मलायकानं ‘अशी’ केली ‘थट्टा’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन  –   देशभरात लॉकडाऊन सुरू असले तरी बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर एक बिझी माणूस आहे. हे आम्ही नाही तर स्वत: अर्जुन कपूर म्हणत आहे. वास्तविक, नुकताच अर्जुनने आरजे मलिष्काबरोबर थेट गप्पा मारल्या. यावेळी त्याने आपल्या दिवसभराचे वेळापत्रक सांगितले. दिवसभर तो काय करतो ते सांगितले. अशा परिस्थितीत मलाइका अरोराला या लाइव्ह सेशनमध्ये कमेंट करायला मजा आली.

मलिष्काशी बोलताना अर्जुन कपूर म्हणाला की, तो सकाळी दहा वाजता उठतो, कॉफी पितो, मग वर्कआउटला जातो. त्याने हे देखील सांगितले की, आजकाल तो नाश्ता करत नाही, तो थेट लंच करतो. अर्जुन म्हणाला की, आंघोळ झाल्यावर तो त्याच्या फोनमध्ये वेळ घालवतो. मग गच्चीवर फिरतो आणि परत खाली येतो. अर्जुनच्या या गोष्टी ऐकताच मलायका अरोराने ‘बड़ी दिलचस्प बात है.’ अशी प्रतिक्रिया दिली.

मलायका अरोराची ही कमेंट पाहून हे स्पष्ट दिसत आहे की, अर्जुन कपूरवर ती चांगलीच नजर ठेवत आहे. त्याचबरोबर अर्जुन कपूरचे वेळापत्रक बाकी लोकांपेक्षा फारसे वेगळे नाही. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लागू केले आहे आणि लोक त्यांचा सर्व वेळ त्यांच्या घरात फोनवर घालवत आहेत.

असे मानले जात आहे की, अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकत्र राहत आहेत. मलायका अरोराच्या लग्नाच्या योजनांबद्दल अर्जुन कपूरला नुकतेच विचारले गेले होते. तो म्हणाला की, लग्न करावे लागले तरी कोरोना विषाणूमुळे तो करू शकत नाही.

याशिवाय अर्जुन कपूर आपल्या चाहत्यांसमवेत व्हर्च्युअल डेटही करत आहे. याबद्दल त्याने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन सांगितले. या व्हर्चुअल डेटमुळे 4.6 लाख रुपये जमा झाले आहे जे त्याने प्रवासी कामगारांसाठी मदत म्हणून दिली आहे.