Malaika Arora | मलायका अरोराने तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल केला ‘हा’ मोठा खुलासा ; म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ही जोडी नेहमीच चर्चेत असते. सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. नुकतेच मलायका आणि अर्जुन हे दोघेही पॅरिसला वेकेशन साठी गेले होते. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या या वेकेशनची माहिती पोस्ट केली होती. ही माहिती मिळताच चाहत्यांमध्ये हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार का? अशा चर्चा सुरु असतानाच आता मलायकाने या प्रश्नांना पूर्णविराम देत एक पोस्ट शेअर केली आहे. मलायकाच्या (Malaika Arora) या पोस्टला चाहत्यांसोबतच स्टार्स कडून देखील शुभेच्छा मिळत आहेत.

 

मलायका ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचा लाजतानाचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि सोबतच तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, “मी हो म्हटले आहे”.मलायकाने तिच्या लग्नाबाबत (To Get Marry Soon) अर्जुन कपूर ला हो म्हटल आहे यात काही शंका नाही. आता मलायका आणि अर्जुनचे चाहते सध्या त्यांच्या लग्नासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर तिच्या या पोस्टवर अनेक स्टार्सने देखील तिला अभिनंदन केले. अभिनेता पुलकित सम्राट (Pulkit Samrat) हा तर खूपच उत्साही असल्याचे दिसत आहे. माही विज (Mahhi Vij), डब्बू रतलानी (Dabboo Ratnani), शमिता शेट्टी (Shamita Shetty) यांनीही कमेंट करून या जोडप्यांचे अभिनंदन केले आहे.

याआधीही या जोडप्यांनी चाहत्यांसमोर त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला होता.
तर ‘कॉफी विथ करण’ (koffee with karan) मध्येही अर्जुन कपूर ने
मलायका (Malaika Arora) आणि त्याच्या नात्याचा स्वीकार केल्याचे पाहायला मिळाले.
या दोघांनी त्यांचे नाते कधीच लपवत नसल्याचे सांगितले आहे.
अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) ह्याच्यासोबत 1998 मध्ये मलायकाचे याआधीच लग्न झाले होते.
लग्नाच्या अठरा वर्षानंतर 2017 मध्ये या दोघांनी घटस्फोट (Divorce) घेण्याचा निर्णय घेतला.
मलायका आणि अरबाजला एक मुलगा सुद्धा आहे. घटस्फोटानंतर दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेल्याचे पाहायला मिळाले.
मलायका अर्जुनाला डेट करत आहे तर अरबाजही जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title :- Malaika Arora | malaika arora and arjun kapoor to get marry soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

NCP Mahesh Tapase | “बावनकुळे यांनी आपल्या मेंदूची आधी तपासणी करुन घ्यावी…”; राष्ट्रवादीच्या महेश तपासे यांचा टोला

Ajit Pawar | मी पळून जाणारा माणूस नाही, मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे – अजित पवार

Sudhir Mungantiwar | काँग्रेसची भूमिका नेहमीच शिवाजी आणि हिंदू देवतांच्या विरोधात राहिली आहे – सुधीर मुनगंटीवार