Malaika Arora | अर्जुन कपूरवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावले खडे बोल; म्हणाली “तो मर्द आहे…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या तिच्या ‘मुव्हिंग इन विथ मलायका’ या शोमुळे चर्चेत आहे. या वेब शोचा चौथा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये मलायकाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. सध्या मलायका (Malaika Arora) बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसह रिलेशनशिपमध्ये आहे.

 

अभिनेता अर्जुन कपूर हा मलायकापेक्षा वयाने लहान असल्याने अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं होतं. या शोच्या माध्यमातून तिने ट्रोल करणाऱ्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या भागात मलायका स्टॅण्ड अप कॉमेडी करताना दिसली. या कॉमेडीच्या माध्यमातून अर्जुन कपूरबरोबरच्या रिलेशनशिपबाबत भाष्य करत ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत.

 

मलायका म्हणाली “माझं वय जास्त आहे, हे माझं दुर्भाग्य आहे.
माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीला मी डेट करत आहे. म्हणजेच माझ्यात हिंमत आहे.
तो मला रस्त्यावर भेटलेला नाही आहे. तो एक समज असलेला व्यक्ती आहे आणि तो एक मर्द आहे.
‘मुव्हिंग इन विथ मलायका’च्या या भागाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

 

Web Title :- Malaika Arora | malaika arora reply to trollers talk about having relationship with arjun kapoor moving in with malaika

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil | ‘शाळा सुरू करण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांनी भीक मागितली’; चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान

MNS Leader Vasant More | “जिथे फुले वेचली तिथे काटे …”; वसंत मोरेंचा शहर कार्यालयात येण्यास नकार

SSC HSC Board Exams | दहावी, बारावीच्या परीक्षार्थींनो सावधान; बोर्डाने बदलले हे दोन नियम