Malaika Arora | मलायकाने ‘या’साठी केले होते अरबाज खानशी लग्न ; “मला घरातून बाहेर…”

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. सध्या ती पुन्हा एकदा चर्चेत असण्याचे कारण म्हणजे ती तिच्या ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ (Malaika Arora) या शोमुळे. मलायका बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्याचबरोबर तिच्या हटके फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच प्रसिद्धी झोतात असते. तिच्या या नवीन शोमध्ये तिने आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.

 

प्रेक्षकांसाठी अभिनेत्री मलायका अरोराचा (Malaika Arora) ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा रिअॅलिटी शो नुकताच भेटीला आला, तर या शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मलायकाने तिचा पूर्वाश्रमीचा पती, बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि मुलगा अरहान याच्या बद्दलदेखील अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तिला फराह खानने विचारले होते की, “तू अरबाज खानशी लग्न का केले होते?. या प्रश्नाचे उत्तर देताना मलायकाने तिच्या आणि अरबाजमधील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

 

लायका म्हणाली, “अरबाज हा खूप छान व्यक्ती आहे. आज मी जे काही आहे ते केवळ त्याच्यामुळेच आहे. त्यांनी मला प्रत्येक वेळी मदत केली. कोणत्याच कामासाठी त्यांनी मला कधीच अडवले नाही. एवढेच नाही तर आमच्या लग्नासाठी मीच त्याला प्रपोजदेखील केले होते. या गोष्टीवर अनेकांचा विश्वास बसत नाही. मात्र, हेच खरे आहे. जेव्हा मी अरबाज खानशी लग्न केले तेव्हा माझे वय खूपच कमी होते. मात्र, मला त्यावेळी घरातून बाहेर पडायचे होते म्हणून मी त्याच्याशी लग्न केले”.

1998 साली अरबाज आणि मलायका हे दोघे विवाह बंधनात अडकले होते.
मात्र, अठरा वर्षांनंतर 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.
सध्या अभिनेत्री मलायका अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनमध्ये आहे,
तर अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहे.

 

Web Title :- Malaika Arora | malaika arora reveled reason why she marry to arbaaz khan in moving in with malaika

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; पिंपरी चिंचवडमधील घटना

Sanjay Raut | ‘काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले, गुजरात भाजपकडे’ – संजय राऊत

Congress Leader Nana Patole | “भाजप सर्वकाही उद्योगपतींसाठी करत आहे”; धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला, नाना पटोले यांची टीका