‘या’ कारणामुळं अर्जुनसोबतचं नावं जगजाहीर करण्याचं ठरवलं : मलायका अरोरा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   आमच्या नात्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. शेवटी आपणहूनच खरे ते सांगून या चर्चेला पूर्णविराम देवू, असे म्हणत अभिनेत्री मलायका अरोराने (malaika-arora) अभिनेता अर्जुन कपूरच्या (arjun-kapoor) नात्याला प्रसारमाध्यमांसमोर अधिकृतपणे कबुली दिली आहे. आयुष्यात दुसऱ्यांदा संधी क्वचितच मिळते, असेही तीने म्हटले आहे. यापूर्वी या दोघांच्या नात्यावर बोलणं अर्जुन-मलायकानं टाळले होते. त्यानंतर एका मुलाखतीत मलायकाने अर्जुनसोबतचं नातं प्रसारमाध्यमांसमोर कबूल का केले याचे कारण सांगितले आहे.

पिंकविला वेबसाइटला मलायका व तिची बहीण अमृता अरोराने मुलाखतीत दिली आहे. या मुलाखतीत मलायका म्हणाली, आमच्याबद्दल खूप चर्चा पसरल्या होत्या. कोणत्याही आधाराविना गोष्टी प्रसारमाध्यमांमध्ये दाखवल्या जात होत्या. त्या चर्चांचा माझ्या कुटुंबीयांवर परिणाम होत होता. रोज उठून पाहिलं तर एक नवी बातमी दिसत होती. म्हणून आपणहूनच खरं काय ते सांगून चर्चांना पूर्णविराम देवू. अर्जुन तुला कसा वाटतो असा प्रश्न अमृताला विचारता असता ती म्हणाली तो खूप शांत आहे. या मुलाखतीत मलायकाने तिच्या लग्नाबाबतच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली आहे. मला कळत नाही की लोकांना इतकी घाई का आहे. एकमेकांना पूर्णपणे ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि सध्या यातच आनंदी असल्याचे ती म्हणाली. मलायका आणि अरबाज खान यांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला होता. 18 वर्षांच्या संसारानंतर हे दोघे विभक्त झाले.

You might also like