मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरबद्दल मुलगा अरहानला काय वाटतं ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं नातं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अर्जुन कपूर आपल्या 34 व्या वाढदिवसानिमित्त मलायकासोबत न्यूयॉर्कमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेला होता. यादरम्यान दोघांच्या अनेक प्रेमाच्या पोस्टही समोर आल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं जगजाहीर केलं आहे. या नात्याबद्दल तिचा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान याला काय वाटतं याबाबत तिनं सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ती बोलत होती. मलायका म्हणाली, “माझा मुलगा माझी प्राथमिकता आहे. तो मला खूप समजून घेतो आणि सपोर्टही करतो. माझ्यासाठी हे खूप गरजेचं होतं. त्याच्यासाठी माझी खुशी आणि माझ्यासाठी त्याची खुशी सर्वाधिक महत्त्वाची आहे. अरहानने माझ्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.” मलायका सांगते की, तिनं अरहानला या नात्याबद्दल सांगितलं आहे. इतकेच नाही तर, तो या नात्यामुळे खुश आहे असंही ती म्हणाली आहे.

View this post on Instagram

♥️

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

यावेळी बोलताना मलायकाने ट्रोलर्सनाही जोरदार प्रत्युत्तर दिले. मलायका म्हणाली की, “लोकं माझ्याबद्दल काय विचार करतात, काय म्हणतात यावर मी लक्ष देत नाही. मला फक्त या गोष्टीची काळजी आहे की, माझा मुलगा, माझी फॅमिली, माझा पार्टनर माझे मित्र काय विचार करतात. मी आधी काम करायचे आणि माझ्या मुलालाही सांभाळायचे आणि आताही तसंच आहे.”

You might also like