लग्नाआधीच रुग्णालयात चेकअपसाठी गेली मलायका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता अर्जुन कपूर सोबत लग्नाच्या चर्चेमुळे सध्या अभिनेत्री मयालका अरोरा प्री मॅरिटियल चेकअप करण्यासाठी रुग्णालयात गेल्याचे समोर आले आहे. एका वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता इस्टर वीकेंडला अर्जुन आणि मलायका हे दोघे लग्न करू शकतात असे म्हटले जात आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अशीही माहिती समोर आली आहे की, दोघांनीही आपापल्या मित्रपरिवाराला या तारखा फ्री ठेवण्यास  सांगितले आहे. शिवाय त्यांच्या लग्नाबद्दल कुठेही काही वाच्यता करायची नाही अशी ताकीदही त्यांचे हेअर स्टायलिस्ट, मेकअप आर्टिस्ट यांना देण्यात आली आहे असेही वृत्तात म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच मलायका तिच्या मैत्रिणींसोबत मालदीवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. परंतु असेही समोर आले की, अर्जुनसुद्धा तिला भेटायला मालदीवला गेला होता. मलायकाची ही बॅचरल पार्टी होती असेही समोर आले आहे. परंतु मलायकाने एका मुलाखतीत बोलताना या सर्व चर्चा अफवा आहेत असे म्हणत तिने सर्व गोष्टी धुडकावून लावल्या होत्या. त्यात तथ्य नसल्याचं तिने सांगितले होते.
परंतु कॉफी विथ करण या शोमध्ये बोलताना मात्र मलायकाने अप्रत्यक्षपणे तिच्या प्रेमाबद्दल कबुली दिली होती. अर्जुन कपूरने देखील  या चॅट शो मध्ये आपल्या लग्नाचेही संकेत त्याने दिले होते.
Loading...
You might also like