अर्जुनने शेयर केला ‘तो’ फोटो ; प्रश्न विचारल्याशिवाय मलायकालाही राहवलं नाही

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन –  बॉलीवूड अॅक्टर अर्जुन कपूर चित्रपटाव्यतिरिक्त मलायका अरोरा सोबतच्या अफेअरमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हे दोघे या दिवसांमध्ये नेहमी सोबत दिसून येत आहेत. नुकताच अर्जुन कपूरने सोशल मीडियावर आपला लहानपणचा फोटो टाकला आहे. अर्जुन त्या फोटो मध्ये घोड्यावर बसला आहे आणि गंभीर अवस्थेत दिसून येतो आहे. हा फोटो शेयर करतांना अर्जुनने लिहिले की, ‘मी हॉर्स राइडिंगची प्रॅक्टिस खूप आधीपासून करत आलो आहे. मला आधीपासूनच माहिती होता की मी पानिपत मध्ये काम करेल.

अर्जुन कपूरचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. त्याच्या या फोटोला मलायकाने देखील कमेंट केली आहे. अर्जुन कपूरचा फोटो बघून मलायकाने कमेंट मध्ये लिहिले की, एवढ्या रागात का आहेस? ही पहिलीच वेळ नाही की मलायकाने अर्जुनच्या फोटोला कमेंट केली नाही ती नेहमी त्याच्या फोटोवर कमेंट करत असते.

 

 

अर्जुन कपूरने एका वृत्तसंस्थेसोबत बोलत असतांना सांगितले की मी लग्न करत नाहीये, आणि मी हे सुद्धा सांगितलं होता कि मी जेंव्हा लग्न करणार आहे तेव्हा तुम्हाला सांगेल आणि माझ्यासोबत मीडियाने चांगली वर्तवणूक केली होती. त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय आणि माझी रिस्पेक्ट सुद्धा केली आहे आणि मला ही अपेक्षा होती तर मी माझा लग्नाची बातमी मीडिया पासून का लपवू . अर्जुन कपूरच्या चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर त्याच्याकडे सध्या एकच चित्रपट आहे आणि तो त्यामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव पानिपत आहे, ज्यामध्ये तो सदाशिव राव भाऊंच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like