मलायकाने आपल्या अफेअरविषयी केला खुलासा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या बॉलिवूडमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर याच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. मलायकाने  अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. सध्या ते दोघे एकत्र दिसत आहेत. या वेडिंग  सिझनमध्ये चर्चा आहे की, मलायका-अर्जुन लवकरच लग्न करू शकतात. स्वतः मलायकाने पहिल्यादा अर्जुनसोबतच्या नात्याविषयी आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.

मलायका आणि अर्जुन एप्रिलमध्ये चर्चमध्ये विवाह करेल. यावर मलायकाने म्हटले आहे की, या सर्व गोष्टी मीडियाने बनवल्या आहेत.  त्यामुळे स्पष्ट झाले आहे की हे कपल लग्न करणार नाही. त्याचबरोबर मलायका म्हणाली तिला आपला संसार कधीच संपुष्टात आणायचा नव्हता. प्रत्येकाला एक रिलेशन हवे असते. मला लोक म्हणाले होते की, मी घटस्फोट घायला नको होता. परंतु मी निर्णय घेतला होता. आता मी खूपच खुश आहे. जे झाले ते चांगलेच झाले.

पुढे मलायका म्हणाली, “मला वाटते की, सर्व मूव्‍ह ऑन करून प्रेम अणि एक साथी मिळवायचा प्रयत्‍न करतात. कोणी असा ज्‍याच्‍यासोबत तुमचे सामंजस्य असेल. जर असे झाले तर तुम्‍ही लकी आहात. तुम्‍हाला जीवनात खुश राहण्‍याची दुसरी संधी मिळाली. काही दिवसांपूर्वी, अर्जुन कपूर एका टॉक शोमध्‍ये पोहोचला होता. अर्जुनला त्यावेळी विचारण्‍यात आले की, ‘तू तुझ्‍या गर्लफ्रेंडला आपल्‍या कुटुंबीयांशी भेटवणार का ?’ यावर अर्जुन म्‍हणाला, ‘असे व्‍हायलाच हवे. खूप काही आहे, जे फॅमिलीत गेल्‍या महिन्‍यात घडले आहे. त्‍यामुळे मला जगण्‍याचा नवा दृष्‍टिकोन मिळाला आहे.’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us