सुरकुत्या मुक्त त्वचा हवी असेल ऐका मलायकाचा सल्ला, आईस क्यूब्स कसे बनवायचे ?

पोलीसनामा ऑनलाइन – मलायका अरोरा जरी चित्रपटांपासून दूर असली तरी बर्‍याचदा ती तिच्या फिटनेसबद्दल नेहमीच चर्चेत असते. ती स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी भारी कसरत करते. मलायका त्वचेची खूप काळजी घेते म्हणून वयाच्या ४५ व्या वर्षीही तिची त्वचा सुरकुत्या मुक्त आणि चमकदार आहे.ती घरगुती उपचार करते.

मलायकाने तिच्या सुंदर आणि चमकत्या त्वचेचे रहस्य सांगितले की, ति चेहऱ्यावर नैसर्गिक गोष्टींनी तयार केलेले आईस क्यूब्स वापरते. मलायकाने तिच्या सुरकुत्या मुक्त त्वचेचे रहस्य उघड केले आहे ती म्हणते आणि की तिला आपल्या चेहऱ्यावर टोमॅटो, पपई, बटाट्याचे आईस क्यूब्स आणि फेस पॅक लावायला आवडते. तर मग जाणून घेऊया नैसर्गिक गोष्टींसह
आईस क्यूब्स कसे बनवायचे …

एका भांड्यात १ चमचा पपईचा गर, १ चमचा टोमॅटोचा रस आणि १ चमचा बटाट्याचा रस एकत्र करून मिश्रण करावे.

आता तयार मिश्रण एका आईस ट्रेमध्ये ठेवून गोठवण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवा.

आईस क्यूब्स तयार झाल्यानंतर करत चेहर्‍यावर लावा.

दररोज हे आईस क्यूब्स वापरू शकता. यामुळे काही दिवसातच चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होऊ लागतील. तसेच, त्वचा चमकदार होईल.

आईस क्यूब्सचे फायदे

पपईमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट आणि फ्री रॅडिकल गुणधर्म चेहऱ्यावर सौम्यपणे शुद्ध होतात आणि पोषण देतात. यामुळे फ्री रॅडिकल्स, काळवंडलेली त्वचा तसेच कोरड्या त्वचेची समस्या दूर होते.

बटाट्याचा रस चेहऱ्यावरील सुरकुत्या, काळे वर्तुळ आणि सनबर्न्सची समस्या दूर करते. आणि निर्जीव व कोरड्या त्वचेला ओलावा देते.

टोमॅटोमध्ये उपस्थित जीवनसत्त्वे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात. मुरुम, डाग, आणि सुरकुत्याच्या समस्येपासून आराम देतात.

जर आपल्यालाही सुरकुत्यामुळे त्रास होत असेल तर नैसर्गिक गोष्टींनी बनविलेले आईस क्यूब्स वापरा. अभिनेत्री मलाइका अरोरा प्रमाणेच त्वचेला चाळीशी नंतरही चिरतरुण ठेवा.