मलाईकाचा ‘हाई स्लिट मरून’ गाऊनमध्ये रॅम्पवर ‘कल्ला’ !

पोलीसनामा ऑनलाईन – लॅक्मे फॅशन वीक २०१९ मध्ये आता दिशा पाटनी, अनन्या पांडे, आयुष्मान खुराना आणि अर्जुन कपूर यांनी  रॅम्प वॉक केल्यानंतर , पाचव्या दिवशी म्हणजे रविवारी शो मध्ये मलाईका अरोरा ने आपले चांगलेच जलवे दाखवले. रॅम्प वॉक करून ती डिझायनर दिया राजवीर साठी शो स्टोपर बनली. ४५ वर्षाची मलाईका जेव्हा रॅम्प वर उतरली तेव्हा लोकांच्या  तिच्यावरून नजरा हटत नव्हत्या.

मरून रंगाच्या अत्यंत सुंदर आऊटफिट मध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिच्या ड्रेस ची डिझाईन अनोखी होती. तीचा ड्रेस तिच्यावर खूप खुलून पण दिसत होता.डीप नेक असलेले अतिशय सुंदर ब्लाउज आणि  हाई स्लिट कट असलेल्या स्कर्ट मध्ये ती खूपच आकर्षित दिसत होती. परंतु मलाईकाचं मेकअप खूप साधं होतं. त्यात तिने बोल्ड मरून लिपस्टिक लावलेले जे तिच्या आऊटफिट ला एकदम साजेसे दिसत होते.
तसेच मलाईका ने आपले केस खुले सोडले होते. आणि आपल्या दोन्ही कानामध्ये स्टायलिश इअरिंग घातले होते.

वॉक च्या दरम्यान कार्यक्रमात लोकं मलाईकाला चिअर करताना दिसले.मलाईका अरोरा चे अर्जुन कपूर सोबत सुरु असलेल्या अफेअर वरून ती  सध्या चर्चेत आहे. ऑफिशियली, काही दिवसांपूर्वी मलाईका ने इंस्टग्राम वर आपले अफेअर असल्याचे सांगितले होते. तिचे चाहते या दोघांच्या जोडीला चांगलेच पसंद  करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like