मलायका अरोराने व्हाइट आउटफिटमध्ये शेयर केला फोटो, दिसली बोल्ड लूकमध्ये

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री मलायका अरोरा आपल्या फिटनेसमुळे खुप चर्चेत असते. नेहमी ती सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहते. फिटनेस फ्रीक मलायका अरोरा जास्तीतजास्त जिम वेयरमध्ये दिसते, मात्र आज मलायकाचा लूक जरा वेगळाच दिसून आला. मलायका अरोराने आपला फोटा शेयर केला आहे. ज्यामध्ये तीने व्हाइट टॉप आणि स्कर्ट घातला आहे. हा फोटो शेयर करून मलायकाने लिहिले आहे, हॅलो संडे, केवळ हसा आणि खुश राहा. मलायकाच्या या फोटोवर लोक खुप प्रेम व्यक्त करत आहेत.

मलायकाने आपल्या ऑउटफिटला गोल्डन इयररिंग्ससोबत मॅच केले आहे. मलायकाने रेड लिपस्टिकसुद्धा लावली आहे. फोटोवर मलायकाला फॅन्सच्या खुप कमेंट येत आहेत. एका फॅनने कमेंट करत लिहिले आहे, कुणी इतके बोल्ड कसे काय असू शकते. तर दुसर्‍याने लिहिले आहे, अर्जुन कपूर कुठे आहे.

बॉलिवुडमध्ये सर्वात फिट अँड फाइन अ‍ॅक्ट्रेसपैकी कए आहे मलायका अरोरा. ती आपल्या कामासह फिटनेससाठीसुद्धा खुप सीरियस असते. बॉलीवुडमध्ये कधी फिटनेसची चर्चा होते तेव्हा मलायकाचे नाव आवश्य येते. तिचे रेग्युलर जिमला जाणे आणि रेग्युलर योगा करणे खुपच कमीवेळा मिस होत असेल.

डिसेंबर महिन्यात मलायका सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव्ह दिसत आहे. नुकतेच मलायका आणि तिची खास मैत्रिण करीना कपूर खा आणि करिश्मा कपूर एका डिनर पार्टीत सहभागी झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी मलायका आणि करीना कपूर खान हिमाचलमध्ये होते, जिथे दोघी खुप एन्जॉय करत होत्या. कारण तिथे सैफ आणि अर्जुन कपूर आपला आगामी चित्रपट भूत पुलिस चे शुटिंग करत होते. यानिमित्ताने दोघींना फिरण्याची संधी मिळाली होती.