PHOTOS : मलायका अरोराने समुद्रकिनारी केले खूपच ‘हॉट’ फोटोशुट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्जुन कपूरसोबत अफेअरमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा मलायका चर्चेचा हिस्सा बनली आहे. नुकतीच मलायका आपल्या गर्ल्स गँगसोबत मालदीव व्हॅकेशनला जाऊन आली. तिथे तिने मस्तीही केली आणि प्रोफेशनल कमिटमेंट्सही पूर्ण केल्या. मालदीवमधील तिचे काही हटके आणि स्पेशल फोटो समोर आले आहेत. सध्या मलायकाच्या या हॉट फोटोंनी सोशलचे वातावरण आणखीच तापवले आहे.

मलायकाचे हे फोटोशुट समुद्रकिनाऱ्याजवळचे आहे. असे समजत आहे की, एका ट्रॅव्हल मासिकासाठी तिने हे फोटोशुट केले आहे. यातील काही फोटो मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. सध्या हे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. मलायकाच्या हॉटनेसने सोशलवर धुमाकूळ घातला आहे.

मलायकाचे फोटो पाहणारे तिच्या प्रेमातच पडले आहेत. चाहत्यांची मलायकाच्या फोटोचे खूपच कौतुक केले आहे. मलायकाच्या चाहत्यांनी लाखोंच्या संख्येत तिचे फोटो लाईक केले आहेत. अनकेांनी तिच्या लुकबद्दल स्तुती करत कमेंटही केली आहे.

मलायका आणि तिचे हॉट फोटो चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. चर्चेत कसं रहावं हे मलायकाला चागंलंच ठाऊक आहे. मलायका सोशलवर नेहमीच अॅक्टीव असते आणि चाहत्यांसाठी नेहमीच हॉट फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असते. तिचे अनेक चाहते तिला इंस्टाग्रामवर फॉलो करतात.

 

आरोग्यविषयक वृत्त