home page top 1

अभिनेत्री मलायकाने शेअर केला ‘तो’ बिनधास्त फोटो, त्यावर अर्जुन कपूर म्हणाला…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या अनेक दिवसांपासून डेटींगच्या वृत्तांमुळे चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लवबर्ड्स मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर न्यूयॉर्कमध्ये एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. मलायका सतत तिच्या व्हॅकेशनचे फोटो शेअर करत असते. तिचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता मलायकाने आपला नवा फोटो शेअर केला आहे ज्यावर अर्जुन कपूरने खास कमेंट केली आहे.

मलायकाने सोशलवर एक नवा फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिसत आहे की मलायकाने व्हाईट क्रॉप टॉप आणि मल्टिकलर जॅकेट घातलं आहे. मलायका आपल्या फोटोत बिंधास्तपणे पोज देताना दिसत आहे. या फोटोला तिने खास कॅप्शनही दिले आहे. कॅप्शनमध्ये मलायका म्हणते की, “#pride #onlylove #pride #pridency.”

https://www.instagram.com/p/BzRE5nRBMAQ/?utm_source=ig_embed

या फोटोची खास बात अशी आहे की, मलायकाने हा फोटो शेअर केल्यानंतर तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने या फोटोवर कमेंट करत त्याला फोटो क्रेडिट देण्याची मागणी केली आहे. अर्जुन मलायकाच्या फोटोवर कमेंट करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. अर्जुन कपूर अधुन मधून मलायकाच्या फोटोवर कमेंट करत असतो.

रिपोर्ट्सनुसार, असे वृत्त समोर येत आहे की, मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करून आपल्या नात्याला नाव देण्याची शक्यता आहे. परंतु अर्जुन कपूरने मात्र लग्नाचे वृत्त खोटे असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे मलायकासोबत आपले नाते मात्र अर्जुनने काही दिवसांपूर्वी कबूलही केले होते. मलायकाने मात्र अर्जुनसोबतच्या नात्यावर अद्याप खुलून भाष्य केलेलं नाही.

चयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी अशी घ्या काळजी

मेंदूच्या तंदुरुस्तीसाठी ‘खा’ हे पदार्थ

योग्य पद्धतीने ‘व्यायाम’ केल्यास होईल लवकर फायदा

अशोक चव्हाणांना ८ वर्षांत न जमलेले ‘ते’ काम १ महिन्यात केले : खासदार चिखलीकर

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन

Loading...
You might also like