अभिनेत्री मलायकाचे ‘स्ट्रेचिंग’ करतानाचे फोटो Super ‘हिट’, काही तासातच लाखो Likes

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस मलायका अरोरा आपल्या फिट अँड फ्लेक्सिबल फिगरसाठी फेमस आहे. गेल्या काही दिवसांपासून तिचे जीम वर्कआऊट आणि योगाचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. असेच फिटनेससंबंधित काही फोटो मलायकाने सोशलवर शेअर केले आहेत जे व्हायरल झाले आहेत.

मलायकाने इंस्टाग्रामवरून स्ट्रेचिंग करताना काही फोटो शेअर केले आहेत. तिने चाहत्यांना स्ट्रेचिंगचे काही फायदेही सांगितले आहेत. फोटो शेअर करताना मलायका म्हणते, “हा एक स्ट्रेच करण्यासारखा दिवस आहे. जेव्हा तुम्हाला वर्कआऊट करण्याची इच्छा नसेल तेव्हा तुम्ही स्ट्रेचिंग करून आपल्या बॉडीला आराम देऊ शकता.” सोबतच तिने स्ट्रेचिंगचे फायदेही सांगितले आहेत.

मलायकाचे हे फोटो सध्या इतके व्हायरल झाले आहेत की, काही तासांतच 1 लाखांहून अधिक लोकांनी हे फोटो लाईक केले आहेत. मलयाकाच्या अनेक चाहत्यांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे.

Visit : Policenama.com