‘BOLD’ अ‍ॅक्ट्रेस ‘मलायका अरोरा’च्या शिमर ड्रेसमधील फोटोंचा सोशलवर ‘बोलबाला’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता अर्जुन कपूर आणि आपल्या बोल्ड फोटोशुटने सतत चर्चेचा हिस्सा बनणारी अभिनेत्री मलायका अरोरा चाहत्यांना आकर्षित करण्याची एकही संधी सोडत नाही. मलायका आजही खूपच हॉट आणि यंग दिसते. यासाठी ती प्रचंड मेहनतही घेत असते. सध्या मलायकाने नवीन फोटोशुट केलं आहे. नेहमीच हॉट अंदाजात दिसणारी मलायका आता मात्र ग्लॅमरस लुकमध्ये दिसत आहे.

समोर आलेल्या नवीन फोटोंमध्ये मलायका आकाशी रंगाच्या शिमर ड्रेसमध्ये दिसत आहे. मलयकाची पोजही चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सध्या मलायकाच्या या नव्या फोटोंची सोशलवर खूप चर्चा सुरू आहे. मलायका या ड्रेसमध्ये खूप वेगळी आणि कमालीची सुंदर दिसत आहे.

वयाची चाळीशी पार केलेली मलायका आजही खूप सुंदर आणि फिट दिसते. अर्जुन कपूरसोबतचं नातं तिने कबूल केल्यानंतर दोघं अनेक ठिकाणी बिंधास्त एकत्र फिरताना दिसतात.

Visit : policenama.com