मलायकाने शेअर केला मुलगा अरहानसोबत फोटो… मुलगा आहे की मुलगी ? म्हणत नेटीझन्सने केले ट्रोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनमुळे मलायका अरोरा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून त्यांच्या दोघांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु आहे. परंतु याबबात बोलताना हे सगळं अफवा असल्याचं मलायका सांगत आहे. नकतीच मलायका तिचा मुलगा अरहानसोबत लंट डेटवर स्पॉट झाली आहे.

दीर्घ कालावधीनंतर या माय-लेकाला एकत्र पाहण्यात आलं आहे. खरेतर मलायका अरोरा तिचा मुलगा अरहानला घेऊन जॉयसी पोलीकार्पच्या घरी गेली होती. येथे अरोरा फॅमिलीने एकत्र जेवण केलं. एकत्र जेवण केल्यानंतर आईच्या घरातून निघताना अरहान आणि मलायका एकत्र स्पॉट झाले.

मलायकाने यावेळी सी ग्रीन कलरची वन शोल्डर मॅक्सी घातली होती. यावेळी मलायका खूपच कूल दिसत होती. तिने कोणतीही ज्वेलरी घातली नव्हती आणि कोणताही मेकअप केला नव्हता. मेकअप नसतानाही मलायका सुंदर दिसत होती.

https://www.instagram.com/p/BwjyafIgpzt/

सोबत असणारा तिचा मुलगा अरहान खान याने व्हाईट टी शर्ट, जिन्स आणि ब्लू डेनिम शर्ट घातला होता. सध्या मलायकाचा तिच्या लेकासोबतचा हा फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी अरहानला ट्रोल करायला सुरु केले आहे.

https://www.instagram.com/p/BwjyVWcAq7H/

अनेकांनी अरहानच्या मोठ्या केसांचीही खिल्ली उडवली. अनेकांनी कमेंट केली की हा मुलगा आहे की मुलगी ? अनेकांनी त्याला नावं ठेवत छोटी मलायका म्हटलं आहे. अनेकांनी तर जान्हवी कपूरचं मेल व्हर्जन म्हणत खिल्ली उडवली आहे.