भाजी खरेदी करायला आली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, तरीही कोणीही नाही ओळखले

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन – सेलिब्रिटींबरोबर फोटो काढावा, त्याचे ऑटोग्राफ घ्यावे असे प्रत्येकालाच वाटत असते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात एक अभिनेत्री मुंबईच्या रस्त्यावरून फिरते आहे. मात्र तिलाच कोणीच ओळखले नाही. हि अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून बॉलिवूडची मुन्नी अर्थातच मलायका अरोरा.

या फोटोमध्ये मुंबईत मलायका भाजी करताना दिसत आहे. इथे ती एकटीच भाजीविक्रेत्याशी मोलभाव करताना दिसत आहे. यावेळी फोटोग्राफर मलायका जवळ पोहोचले त्यावेळी तिला भाजी खरेदी करताना कोणताही कमीपणा वाटला नाही.

 

 

 

विशेष बाब म्हणजे, सिनेमांमधून लोकप्रिय झालेल्या मलायकासोबत ना भाजीवाल्याने ना सामान्य माणसाने सेल्फी काढला.मलायका अरोरा डान्सबरोबर तिच्या लूकमुळेही चर्चेत असते. नुकतेच तिने केलेलं बोल्ड फोटोशूटही व्हायरल झालं होत. काही दिवसांपूर्वी ती कोरोनाबाधित आढळली होती. त्यामुळे ती इंडियाज बेस्ट डान्सर कार्यक्रमातून गायब झाली होती. सध्या ती फिटनेसवर भर देत आहे.