मलायका अरोरा भर पावसात ‘अशा’ अवतारात निघाली योगा क्लासला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा आपल्या फिटनेसला घेऊन कोणतीही तडजोड करत नाही. फिट राहण्यासाठी मलायका हेल्दी लाईफस्टाईल आणि फिटनेस रुटीनला स्ट्रीक्टली फॉलो करत असते. मलायकाचे नवीन फोटो याकडे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

image.png

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतील मुसळधार पाऊसही मलायकाच्या फिटनेस रुटीनमध्ये अडचण बनू शकला नाही. फोटोत तुम्ही पाहू शकता की, मलायका भर पावसात छत्री घेत आपल्या योगा क्लाससाठी बाहेर पडली आहे.

image.png

हे फोटो मलायकाच्या योगा क्लासबाहेरील आहे. फोटोत मलायका हातात छत्री घेऊन जाताना दिसत आहे. मलायकाने ब्लॅक पायजमा आणि व्हाईट स्पोर्ट ब्रा घातली आहे. सोबत तिने स्लीपर्सही घातल्या आहेत. हाय हेअर बन आणि नो मेकअप लुकमध्ये मलायका खूप फ्रेश आणि स्टनिंग दिसत आहे.

image.png

मलायकाचा एक फोटो खूपच चर्चेत आला होता. या फोटोत मलायका स्प्लिट करताना दिसत होती. मलायकाच्या फोटोतील तिच्या फ्लेक्सिबल बॉडीची सोशलवर खूप चर्चा झाली. मलायकाला स्प्लिट करताना पाहून चाहते मलायकाच्या फोटोवर कमेंट करत होते की, अर्जुन कपूर खूप लकी आहे.

image.png

मलायकाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती अर्जुन कपूरसोबतच्या अफेअरमुळे लाईमलाईटमध्ये आहे. अर्जुन आणि मलायका नेहमीच सोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत असतात. अर्जुन कपूरच्या वाढदिवशी मलायकाने एक रोमँटीक फोटो शेअर करत आपले नाते जाहीर केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –