‘त्या’ महिला सर्वात जास्त आनंदी राहतात, मलायका अरोरानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या हॉट फोटोंमुळं आणि योगामुळं नेहमीच चर्चेत असते. सोशलवर सक्रिय असणारी मलायका नेहमीच आपले बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. मलायकानं शेअर केलेले तिचे काही थ्रोबॅक फोटो सोशलवर झपाट्यानं व्हायरल झाले होते. यानंतर पुन्हा एकदा आपल्या फोटोमुळं मलायका अरोरा चर्चेत आली आहे. सध्या सोशल वर तिच्या एका पोस्टनं लक्ष वेधलं आहे.

महिला दिनाच्या दिवशी मलायकानं कोणत्या महिला जीवनात आनंदी राहतात याबद्दल सांगितलं आहे. मलायकानं एक पोस्ट शेअर करत याबाबत सांगितलं आहे. मलायकानं तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि आपल्या भावना मांडल्या आहेत.

महिला दिनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये मलायकानं लिहिलं की, “आज त्या महिला आनंदी नाहीत. ज्यांचं लग्न झालं आहे किंवा ज्या सिंगल आहेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत उत्तम करिअर आहे अशा महिला आनंदी असतातच असं नाही. तर ज्या महिला स्वत: भरपूर आणि निस्सिमपणे प्रेम करतात त्या महिला सर्वात जास्त आनंदी असतात.”

पुढे मलायका म्हणते, “अशा महिला आनंदी आहेत ज्या भूतकाळ विसरून आत्मसन्मानासाठी काम करत आहेत आणि कामाला जास्त महत्त्वाचं मानतात. ज्यांनी स्वत:ला पीडित मानणं सोडलं आहे. ज्यांनी राग, अश्रू आणि कटुता मागे सोडून पुढे निघून गेल्या आहेत.”

https://www.instagram.com/p/B9jOhbhBQk8/

https://www.instagram.com/p/B9HUR85plX8/

https://www.instagram.com/p/B8XRVznJ7ZH/

https://www.instagram.com/p/B7yewkyp9Rb/

https://www.instagram.com/p/B5v9IskpY8_/