‘बेबी डॉल’ सनी लिओनीसह ‘या’ टॉप ४ अभिनेत्री बेस्ट ‘पोल डान्सर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या डान्स फॉर्म करताना दिसतात. परंतु पोल डान्स करताना खूप कमी अभिनेत्री दिसतात. पोल डान्स करणाऱ्या अभिनेत्रींची संख्या पाहिली तर खूपच कमी आहे. काही अभिनेत्री आहेत ज्या पोल डान्समध्ये अगदी तरबेज आहेत. वेळोवेळी अनेकदा त्यांनी आपल्या पोल डान्सचा जलवाही दाखवला आहे.

१) मलायका अरोरा- अभिनेत्री मलायका अरोरा जेव्हा कधी एखाद्या इव्हेंटला जाते तेथे सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. मग ते रेड कारपेट असो किंवा एखादा शो असो. २००२ साली आलेल्या कांटे या सिनेमात मलायकाने पोल डान्स केला होता. यानंतर मलायका इंडियाज टॉप मॉडेलमध्ये पोल डान्स करतानाही दिसून आली होती. मलायकाने पोल डान्सचे खास ट्रेनिंग घेतले आहे.

Malayaka-Arora-pole

२) जॅकलीन फर्नांडिस- जॅकलिन फर्नांडिसचा पोल डान्स तर जगजाहीर आहे. जॅकलीन नेहमीच डान्सचे वेगवेगळे फॉर्म शिकताना दिसत असते. जर पोल डान्सचा विषय असेल तर, जॅकलीन एखाद्या परफेक्ट आर्टिस्टसारखीच पोल डान्स करते.

Jaqculine-Pole

३) जरीन खान- अभिनेत्री जरीन खानच्या सौंदर्याचे आणि अभिनयाचे अनेक दीवाने आहेत. जरीन खानने वजह तुम हो या सिनेमात माही वे या गाण्यावर हॉट पोल डान्स केला होता. तिचा पोल डान्स चाहत्यांना विशेष आवडला होता.

Khan-Pole

४) सनी लिओनी- बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीच्या फिगरचा प्रत्येकजण दीवाना आहे. जेव्हा सनी लिओनी बिग बॉसच्या घरात होती तेव्हा तिने ये मेरा दीवानापन गाण्यावर पोल डान्स केला होता. सनीच्या पोल डान्सने सर्वांचे मन जिंकले होते. त्यानंतर सनी कधी हा डान्स करताना दिसली नाही.

Sunny-Pole

वजन कमी करण्यासाठी ‘त्रिफळा’ उपयोगी

पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे अनेक फायदे

लाकडी कंगवा कमी करतो ‘केसाच्या’ तक्रारी

किचनमधील ‘या’ वस्तू करतील जखमांवर जालीम उपाय

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

आधी एक भुमिका आणि खासदार झाल्यावर एक, इम्तियाज जलीलजी, हे वागणंं बरंं न्हवं !