‘मलायका अरोरा’नं स्विमिंग पूलमध्ये केला योगा, चर्चेत आला फोटो

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी चर्चेत असते. मलायका सध्या तिचा प्रियकर अर्जुन कपूरसोबत गोव्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. त्यांनी गोव्यातच आपले नवीन वर्ष साजरे केले आहे. मलायका बर्‍याचदा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह रहात असते आणि तिचे अपडेट्स चाहत्यांसमवेत शेअर करत असते. अलीकडेच मलायकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. आपला फोटो शेअर करताना तिने या योगाच्या नावाबरोबर याचे फायदेही सांगितले.

मलायकाने फोटो शेअर करत या योगाचे नाव ‘उत्थिता हस्ता पादांगुष्ठासन योग’ (Utthita Hasta Padangusthasana) असल्याचे सांगितले. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की ती स्विमिंग पूलमध्ये हा योगा करताना दिसत आहे. तिने ही पोस्ट सोमवारी शेअर केली होती. ज्यामध्ये तिने योगाचे तपशीलवार वर्णन केले आहे. हा फोटो शेअर करताना मलायका अरोराने एक नोट देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, चला नवीन वर्षाच्या दिवशी वर्कआउट्स आणि योगासनांचा प्रारंभ करून नवीन आठवड्याची सुरुवात करूया.

मलायका अरोरा सुरुवातीपासूनच आपल्या फिटनेसबाबत खूपच गंभीर आहे. ती बर्‍याचदा सोशल मीडियावर योगासने किंवा फिटनेस टिप्स देताना दिसत असते. मलायकाचे चाहते तिच्या फिटनेस टिप्सचे अनुसरण देखील करतात. अभिनेत्रीच्या या फोटोला तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून खूप प्रेम देत आहेत. अलीकडे मलायकाने स्विमिंग पूलची आणखी काही फोटो शेअर केली आहेत. त्या फोटोंमध्ये ती बिकिनीमध्ये दिसत आहे तसेच मलायका पोज देतानाही दिसू शकते.

अधिक माहिती म्हणजे मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर त्यांच्या रिलेशनशिपविषयी बरेच चर्चेत आहेत. हे कपल अनेकदा आपल्या सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो देखील शेअर करत असतात. अलीकडेच त्यांचा एक फोटो समोर आला होता जो गोव्यातील न्यू इयर पार्टीचा होता. दोघेही फोटोत एकमेकांसोबत खूपच आनंदी दिसत होते.