अरबाजच्या सट्टेबाजीला कंटाळूनच मलायकाने दिला घटस्फोट !

ठाणेः पोलीसनामा आॅनलाईन

अरबाज खानच्या सट्टेबाजी प्रकरणात अनेक नवनविन खुलासे समोर येत आहेत. आज (शनिवारी) अरबाजने सट्टा लावल्याची कबुली दिल्यानंतर सट्टे्बाजीच्या सवयीला कंटाळून त्याची पत्नी अभिनेत्री मलायका अरोरा हिने पती अरबाजला घटस्फोट दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेकदा सलमान खान ने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र अरबाजने सट्टा लावण्याचे काही बंद केले नाही.

अरबाज खान तब्बल 2 कोटी 80 लाख रुपये हरला असून ती रक्कम बुकी सोनू मालाड याला देण्यात टाळाटाळ केली होती. यावरुन हा प्रकार समोर आला आहे. अरबाज खान हा ठाणे खंडणी विरोधी गुन्हे पथकाच्या कार्यालायात पोहचला असून, त्या ठिकाणी त्याची कसून चाैकशी सुरू झाली आहे. अरबाज खानला सट्टा लावण्याचा मोठा नाद असून, तो कधीच जिंकला नाही. अरबाज सट्ट्यामध्ये हरलेले पैसे देत नसल्यामुळे सोनू त्याला पैशासाठी धमकी देत होता, त्यासंबधीच्या आॅडिअो क्लिप देखील हाती लागल्या आहेत. याप्रकरणात अनेक नवी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

धक्कादायक….अखेर अरबाज खानने दिली सट्टा लावल्याची कबुली