अभिनेता अर्जुन सोबतच्या लग्नाबाबत खुद्द मलायकाचा मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. नकुतीच ती सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तिच्या मैत्रिणींसोबत मालदीवला गेली होती. तिची ही बॅचलर पार्टी असल्याचेही म्हटले जात आहे. ती लवकरच अर्जुनसोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. तिला मालदीवला अर्जुन कपूरदेखील भेटल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये उत्सुकता असल्याचे दिसत आहे. परंतु मलायकाने आता यावर अधिकृतपणे भाष्य करत तिच्या आणि अर्जुनच्या लग्नाचा खुलासा केला आहे.

गोव्यात मलायका आणि अर्जुन एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याचे म्हटले जात होते. त्यासाठी ते चांगल्या चर्चच्या शोधात आहे असेही समोर आले होते. परंतु नुकताच आता खुद्द मलायकाने तिच्या लग्नाचा खुलासा केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती. यावेळी बोलताना तिने लग्नाचे वृत्त धुडकावून लावले आहे. या सर्व अफवा आहेत असे मलायका म्हणाली. असे असले तरी मलायका आणि अर्जुनला अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे. मलायकाने त्यांच्या नात्याचीही कबुली अद्याप दिलेली नाही.

मलायकाने 2017 मध्ये पती अरबाज खान सोबत घटस्फोट घेतला त्यानंतर ती अर्जुन कपूरला डेट करू लागली. त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या. आणि अलीकडेच ते दोघे लग्न करणार असल्याची कुजबूज सुरु झाली. तिच्या लग्नाला केवळ करिश्मा, करिना, दीपिका, रणवीर हेच कलाकार असतील आणि ते गोव्यात ख्रिश्चन पद्धतीने लग्न करतील असे म्हटले जात होते. परंतु या अफवा असल्याचं मलायकाने सांगतिले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us