मलायका म्हणते, “मी आणि अरबाज एकमेकांना नव्हतो देऊ शकत….”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या नवीन आणि जुन्या नात्यामुळे चर्चेत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मलायका आणि अर्जुन या आठवड्यात लग्न करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. मलायका आणि अरबाज खान यांचाही घटस्फोट झाला आहे. अशातच मलायकाने तिची मैत्रीण करीना कपूरला अरबाज खान आणि तिच्या नात्यातील एक मोठा खुलासा केला आहे. सध्या या गोष्टीची चांगलीच चर्चा सुरू आहे.

व्हॉट वुमन वॉन्ट या करीना कपूरच्या रेडिओ शोमध्ये मलायकाने आपल्या मनातील गोष्ट सांगितली आहे. यावेळी बोलताना मलायका म्हणाली की, “मी आणि अरबाज आम्ही दोघेही या नात्यात खुश नव्हतो. परंतु त्याची फॅमिली खूपच सपोर्टीव आहे. डिवोर्सच्या वेळेही त्याच्या फॅमिलीने मला खूप सपोर्ट केला. एका चांगल्या वातावरणात मुलांचं पालन पोषण होणे गरजेचे असते. तिच्या अशा रिलेशनशिपमुळे आजूबाजूचे वातावरणही खराब होत होते. या सिच्युएशनमध्ये आम्ही दोघेही होतो. आम्ही दोघेही एकमेकांना नाखुश करत होतो.

मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. 18 ते 20 एप्रिल दरम्यान त्यांचं लग्न होऊ शकतं असं म्हटलं आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like